गोवा: मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे नरेंद्र मोदी यांनी घेतले अंतिम दर्शन, मिरामार बीच वर होणार अंतिम संस्कार
कला अकादमीमध्ये ठेवण्यात आलेल्या पर्रिकरांच्या पार्थिवाचे त्यांनी अंतिम दर्शन घेतले.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांची मागील वर्षभरापासून सुरू असलेली स्वादूपिंडाच्या कॅन्सरसोबतची (Pancreatic Cancer) झुंज अखेर संपली आहे. रविवार17 मार्चच्या संध्याकाळी गोव्यातील पर्रिकर यांच्या राहत्या घरीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. लढवय्ये पर्रिकर त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत गोव्यासाठी काम करत होते. मागील 3-4 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. अखेर काल त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मनोहर पर्रिकर यांच्या निधनाचं वृत्त समजाताच राजकीय क्षेत्र, कलाकार आणि सामान्य गोवेकरांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गोव्यात गर्दी केली आहे. मनोहर पर्रीकर यांचा बळी घेणारा 'स्वादुपिंडाचा कॅन्सर' World’s Toughest Cancer म्हणून ओळखला जातो, या कॅन्सरमध्ये रुग्ण बचावण्याची शक्यता अत्यल्प का असते?
नरेंद्र मोदी यांच्याकडून पर्रिकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील आज गोव्यामध्ये पोहचले. कला अकादमीमध्ये ठेवण्यात आलेल्या पर्रिकरांच्या पार्थिवाचे त्यांनी अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर पर्रिकर कुटुंबीयांशी भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. मनोहर पर्रिकर यांचे निधन: नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांची ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली
आज संध्याकाळी मिरामार बीच परिसरात मनोहर पर्रिकर यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहे. सध्या गोव्यात भाजप सरकारचे राज्यातील मुख्यमंत्री, भाजपा अध्यक्ष अमित शहा, नितिन गडकरी, निर्मला सीतारामण उपस्थित राहणार आहेत. आज थोड्याच वेळात पर्रिकरांनंतर भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकणार का? हा राजकीय पेच आहे. त्याबाबत नितीन गडकरी स्थानिक पक्षांसोबत बातचीत करून वाटाघाटी करत आहेत.