अफगाणिस्तानात असलेल्या सर्व भारतीयांना सुखरुप आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देशन

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरु असलेल्या सध्याच्या परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी आज एक महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती.

PM Narendra at Modi Meeting. (Photo Credits: ANI)

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)  सुरु असलेल्या सध्याच्या परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी आज एक महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांनी बोलावल्या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि एनएसए अजित डोवाल सुद्धा उपस्थितीत होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटीची बैठक अफगाणिस्तान संबंधित होती. तसेच बैठकीत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृगंला यांच्या व्यतिरिक्त अफगाणिस्तान मध्ये भारताचे राजदूत रुद्रेंन्द्र टंडन सुद्धा होते. जे आजच वायुसेनेच्या विमानाने भारतात परतले आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या समोर बैठकीत अफगाणिस्तानात कशा प्रकारे तालिबान यांनी ताबा मिळवला असून तेथील परिस्थितीबद्दल त्यांना अधिक माहिती दिली गेली. हर्ष श्रृगंला यांनी भारतीय रणनीतीचा आढावा देत आव्हाने आणि संभावना कोणत्या असू शकतात याबद्दल सांगितले. असे मानले जात आहे की, तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर देशातील पश्चिम सीमा (खासकरुन जम्मू-कश्मीर संदर्भात) संबंधित येणाऱ्या आव्हानांवर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली.(हिंदू पंडित राजेश कुमार यांचा अफगाणिस्तान मधील मंदिर सोडण्यास नकार, तालिबानने ठार मारले तरीही माझी सेवा करत राहणार)

अफगाणिस्तानच्या परिस्थिती संदर्भात नरेंद्र मोदी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. ते रात्री उशीरा पर्यंत तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते. जेव्हा विमानाने तेथून उड्डाण केले त्याबद्दल सुद्धा मोदी यांना अपडेट करण्यात आले. त्यांनी निर्देशन दिले आहेत की, जामनगर येथे परतणाऱ्या सर्व नागरिकांची भोजनाची पर्याप्त व्यवस्था करावी. त्याचसोबत भारतीयांना कसे सुखरुप परत आणता येईल हे सुद्धा ठरवा असे मोदी यांनी निर्देशन दिले आहेत. मोदी यांनी पुढे असे म्हटले की, भारतात येणाऱ्या हिंदू आणि सिख अल्पसंख्यांकांना सुद्धा येथे स्थान दिले जाणार आहे.(Kabul Airport Chaos: अफगाणिस्तान मधील Hamid Karzai विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमानातून 2 जण पडले; Watch Video)

तालिबान्यांच्या ताब्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती दरम्यान भारतीय राजदूत आणि दूतवास कर्मचाऱ्यांसह 120 भारतीयांना घेऊन वायुसेना ग्लोबमास्टर हिंडन एअरबेस येथे पोहचले आहे. अफगाणिस्तानचे राजदूत रुद्रेन्द्र टंडन यांनी असे म्हटले की, अद्याप सुद्धा राजधानी काबुल मध्ये काही भारतीय आहेत. एअर इंडियाकडून तेथील विमानतळे सुरु राहतील तोपर्यंत आपली व्यावसायिक सेवा सुरु ठेवणार आहे.