पंतप्रधान मोदी डेहरादूनमध्ये दाखल ; भारत-चीन सीमेवरच्या जवानांसोबत साजरी करणार दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ही दिवाळी भारत-चीन सीमेवरील जवानांसोबत साजरी करणार आहेत.
देशभरात दिवाळीचा उत्साह आणि जल्लोष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ही दिवाळी भारत-चीन सीमेवरील जवानांसोबत साजरी करणार आहेत. यासाठी बुधवारी (7/11/2018) मोदी उत्तराखंडची राजधानी डेहरादून येथे दाखल झाले. सर्वप्रथम मोदी केदारनाथचे दर्शन घेतील. केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर हर्षिल बॉर्डच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतील.
पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाची सरकार गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत आहे. यासाठी व्हिआयपी हेलीपॅडपासून ते केदारनाथ मंदिरापर्यंतच्या मार्गावरील बर्फ हटवण्यात आला आहे.
जवानांसोबत दिवाळी साजरी करताना मोदींसोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारी देखील हजर असतील. तसंच या कार्यक्रमासाठी आयटीबीपीचे डिरेक्टर जनरल आरके पंचनंदा देखील काल संध्याकाळी हर्षिल बॉर्डरवर दाखल झाले.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement