PM-CM Meeting मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सह बिगर भाजप शासित राज्यांना सुनवलं; Petrol Diesel Price कमी करण्यासाठी दिला सल्ला
हीटव्हेवचा धोका असल्याने अनेक ठिकाणी आगी लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्या बाबतही अप्रिय घटना टाळण्यासाठी सरकारने सतर्क असावं असं म्हटलं आहे.
देशात काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. यावेळी ट्रॅकिंग ट्रेसिंग ट्रीटमेंट यालाच पुन्हा प्राधान्य देत लसीकरण मोहिमेवर भर देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना दिला आहे. देशात लहान मुलांसाठी सुरू झालेले लसीकरण आणि बुस्टर डोस यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा सल्ला दिला आहे. पण यावेळी त्यांनी देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरांवरून (Petrol-Diesel Rates) बिगर भाजप शासित राज्यांना सुनावलं देखील आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज झालेल्या बैठकीमध्ये सहा महिन्यांपूर्वी कसा केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केला तसा राज्यस्तरावरील कर बिगर भाजपशासित सरकारांनी घ्यावा आणि सामान्यांची वाढत्या इंधनदर वाढीमधून सुटका करावी असे नमूद केले आहे. राज्यांच्या करांमुळे देशात काही ठिकाणी इंधनासाठी अधिक पैसावे मोजावे लागणं अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे देखील वाचा: CNG Rate: राज्य सरकारने 1 एप्रिलपासून CNG वरील मूल्यवर्धित कर 13.5 टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आणण्याचा घेतला निर्णय .
देशात यंदा उन्हाळा अपेक्षेपेक्षा लवकर आणि अधिक तीव्र झाला आहे. हीटव्हेवचा धोका असल्याने अनेक ठिकाणी आगी लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्या बाबतही अप्रिय घटना टाळण्यासाठी सरकारने सतर्क असावं असं म्हटलं आहे.
कोरोना चं संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे सुविधा, मेडिकल कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आणि मनुष्यबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे.