Petrol-Diesel Price: पेट्रोल, डिझेल दर स्थिर, जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांतील इंधन दर
त्यानंतर आज (2 सप्टेंबर) म्हणजेच महिन्याच्या दुसऱ्या दिवशीही इंधन कंपन्यांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आज पेट्रोल, डिझेल दर (Fuel Price) स्थिर असून त्यात कोणताही बदल झाला नाही.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल, डिझेल (Petrol-Diesel Price) दरांमध्ये काहीशी कपात झाली. त्यानंतर आज (2 सप्टेंबर) म्हणजेच महिन्याच्या दुसऱ्या दिवशीही इंधन कंपन्यांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आज पेट्रोल, डिझेल दर (Fuel Price) स्थिर असून त्यात कोणताही बदल झाला नाही. देशांतील प्रमुख शहरांमध्ये काल पेट्रोल, डिझेल दरात प्रतिलीटर 13 ते 15 पैशांची कपात झाली होती. संपूर्ण आठवडात इंधन दर स्थिर राहिल्यानंतर ही कपात करण्यात आली होती. असे असले तरी पाठीमागील काही दिवसांपासून पेट्रोल हे शंभरीपारच राहिले आहे. त्यामुळे एक लीटर पेट्रोल भरायचे असेल तर शंभर रुपये खर्च करण्यावाचून ग्राहकास पर्याय नाही. इथे जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांतील इंधन दर.
देशातील प्रमुख शहरांतील 2 सप्टेंबरचे पेट्रोल, डिझेल दर
दिल्ली:
पेट्रोल – 101.34 प्रति लीटर
डिझेल - 88.77 प्रति लीटर
मुंबई:
पेट्रोल – 107.52 प्रति लीटर
डिझेल – 96.48 प्रति लीटर
कोलकाता:
पेट्रोल – 101.72 प्रति लीटर
डिझेल – 91.84 प्रति लीटर
चेन्नई:
पेट्रोल – 99.08 रुपये प्रति लीटर
डिझेल – 93.38 प्रति लीटर
बेंगळुरु:
पेट्रोल – ₹104.84 प्रति लीटर
डिझेल – ₹94.19 प्रति लीटर
भोपाळ:
पेट्रोल – ₹109.91 प्रति लीटर
डिझेल – ₹97.72 प्रति लीटर
लखनऊ:
पेट्रोल- 98.43 रुपये प्रति लीटर
डिझेल - 89.15 रुपये प्रति लीटर
पटना:
पेट्रोल – ₹103.89 प्रति लीटर
डिझेल – ₹94.65 प्रति लीटर
चंडीगढ:
पेट्रोल – ₹97.53 प्रति लीटर
डिझेल – ₹86.48 रुपये प्रति लीटर
हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून)
देशातील प्रत्येक पेट्रल पंपावर दररोज सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. कारण प्रत्येक ठिकाणचे स्थानिक महसूली कर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात अनेकदा पेट्रोल डिझेल तर वेगवेगळे असू शकतात. आपण पेट्रोल-डिझेलचे आपल्या प्रदेशातील दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात.