Petrol-Diesel Price: सलग 18 व्या दिवशीही भारतातील इंधन दर स्थिर, पाहा आजचा दर

सलग 18 दिवस झाले देशातील इंधन दर Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क (Excise Duty) कपात केल्यानंतर इंधन मार्केटींग कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही.

Petrol-Diesel | (Photo Credit: ANI)

देशातील इंधन दरात (Fuel prices in India) काहीशी स्थिरता पाहायला मिळत आहे. सलग 18 दिवस झाले देशातील इंधन दर Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क (Excise Duty) कपात केल्यानंतर इंधन मार्केटींग कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. कच्चा तेल दरात पाठिमागील काही आठवड्यांपासून काहीसी घट पाहायला मिळते आहे. Bloomberg Energy Index ने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारीच्या कॉन्ट्रॅक्टनुसार इंधन दर प्रति बॅरल 78.30 डॉलर आहे. पाठिमागील दोन महिन्यांच्या वाढीनंतरत क्रूड 84 डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचला होता.

देशातील इंधन दराबाबत बोलायचे तर मेट्रो शहरात पेट्रोल 100 रुपयांच्याही वर आहे. दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 104 रुपयांच्या आसपास आरे. तर मुंबईत पेट्रोल 110 रुपयांच्या वर आहे. डिझेल मात्र, सर्व मेट्रो शहरांमध्ये जवळपास 85 ते 95 रुपये प्रतिलीटर दरात आहे. (हेही वाचा, Impact of Excise Duty Reduction: पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कपातीचा काय होणार परिणाम? केंद्रावर किती पडणार बोजा, जनतेचा किती फायदा?)

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल, डिझेल दर (प्रति लीटर)

दिल्ली:

पेट्रोल – ₹103.97 प्रति लीटर

डिझेल- ₹86.67 प्रति लीटर

मुंबई:

पेट्रोल – ₹109.98 प्रति लीटर

डिझेल– ₹94.14 प्रति लीटर

कोलकाता:

पेट्रोल – ₹104.67 प्रति लीटर

डिझेल– ₹89.79 प्रति लीटर

चेन्नई:

पेट्रोल – 101.40 रुपये प्रति लीटर

डिझेल– ₹91.43 प्रति लीटर

नोएडा:

पेट्रोल – ₹95.51 प्रति लीटर

डिझेल– ₹87.01 प्रति लीटर

भोपाल:

पेट्रोल – ₹107.23 प्रति लीटर

डिझेल– ₹90.87 प्रति लीटर

बेंगळुरु:

पेट्रोल – ₹100.58 प्रति लीटर

डिझेल– ₹85.01 प्रति लीटर

लखनऊ:

पेट्रोल- 95.28 रुपये प्रति लीटर

डिझेल- 86.80 रुपये प्रति लीटर

चंडीगढ:

पेट्रोल – ₹94.23 प्रति लीटर

डिझेल– 80.90 रुपये प्रति लीटर

देशातील प्रत्येक पेट्रल पंपावर दररोज सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. कारण प्रत्येक ठिकाणचे स्थानिक महसूली कर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात अनेकदा पेट्रोल डिझेल तर वेगवेगळे असू शकतात. आपण पेट्रोल-डिझेलचे आपल्या प्रदेशातील दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात.