Petrol-Diesel Price: पेट्रोल- डिझेल दरामध्ये ग्राहकांना दिलासा, पाहा आजचे दर

तर मुंबईतही पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत डिझेलमध्येही 13 पैशांची घट पाहायला मिळाली. एका बाजूला पेट्रोल-डिझेल दरात किरकोळ कपात होत असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder Price Hike) 25 रुपयांनी महागला आहे.

Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशभरातील पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel) ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अर्थातच हा दिलासा मोठ्या स्वरुपात नाही. पाठीमागील आठवड्यात पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Price) काहीसे स्थिर राहिले होते. त्यानंतर आज इंधन कंपन्यांनी इंधन दरात काहीशी कपात करत जनतेला दिलासा दिला. राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल दरात 15 पैशांची कपात पाहायला मिळाली. तर मुंबईतही पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत डिझेलमध्येही 13 पैशांची घट पाहायला मिळाली. एका बाजूला पेट्रोल-डिझेल दरात किरकोळ कपात होत असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder Price Hike) 25 रुपयांनी महागला आहे.

इंधन दरात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या कच्च्या तेल दराबाबत सांगायचे तर कच्चा तेलांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय कच्चा तेल बाजाराचे अभ्यासक सांगतात, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड 0.83% घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कच्चे तेल प्रति बॅरल 71.63 डॉलरवर पोहोचला आहे. तर वायदा बाजारातही इंधन दरात कच्चा तेल दरात 61 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. जी 5,010 रुपयांवर पोहोचली आहे. जागतीक न्यूयॉर्क मध्ये टैक्सास इंटरमीडिएट कच्चा तेलाचे दर 1.23 % घसरण पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून)

देशभरातील प्रमुख शहरांतील 1 सप्टेंबरचे पेट्रोल, डिझेल दर

दिल्ली:

पेट्रोल – 101.34 प्रति लीटर

डिझेल- 88.77 प्रति लीटर

मुंबई:

पेट्रोल – 107.52 प्रति लीटर

डिझेल– 96.48 प्रति लीटर

कोलकाता:

पेट्रोल – 101.72 प्रति लीटर

डिझेल– 91.84 प्रति लीटर

चेन्नई:

पेट्रोल – 99.08 रुपये प्रति लीटर

डिझेल– 93.38 प्रति लीटर

बंगळुरु:

पेट्रोल – 104.84 प्रति लीटर

डिझेल– ₹94.19 प्रति लीटर

भोपाळ:

पेट्रोल – ₹109.91 प्रति लीटर

डिझेल– ₹97.72 प्रति लीटर

लखनऊ:

पेट्रोल- 98.43 रुपये प्रति लीटर

डिझेल- 89.15 रुपये प्रति लीटर

पटना:

पेट्रोल –103.89 प्रति लीटर

डिझेल– ₹94.65 प्रति लीटर

चंडीगढ़:

पेट्रोल – ₹97.53 प्रति लीटर

डिझेल– ₹86.48 रुपये प्रति लीटर

देशातील प्रत्येक पेट्रल पंपावर दररोज सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. कारण प्रत्येक ठिकाणचे स्थानिक महसूली कर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात अनेकदा पेट्रोल डिझेल तर वेगवेगळे असू शकतात. आपण पेट्रोल-डिझेलचे आपल्या प्रदेशातील दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात.