चीनचे अध्यक्ष Xi Jinping आणि राजदूत Sun Weidong यांच्याविरुद्ध याचिका दाखल; कोरोना व्हायरस मुद्दाम पसरविल्याचा आरोप

चीनमध्ये या विषाणूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे अशीच परिस्थिती सध्या इटली आणि इराणमध्ये आहे

Sun Weidong आणि Xi Jinping (संग्रहित संपादित प्रतिमा)

चीनच्या (China) वूहान प्रांतातून पसरलेला कोरोना व्हायरस (Corona Virus) बघता बघता जगातील अनेक देशांत पोहचला आहे. चीनमध्ये या विषाणूमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे अशीच परिस्थिती सध्या इटली आणि इराणमध्ये आहे. या विषाणूमुळे उद्योगधंदे ठप्प झाले असून, समोर आर्थिक मंदी आ वासून उभी असलेली दिसत आहे. अशात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) आणि भारतातील चीनी राजदूत सनवीडोंग (Sun Weidong) यांच्याविरोधात मुझफ्फरपूर (Muzaffarpur) एडीजे कोर्टात तक्रार दाखल केली आहे. मुजफ्फरपूर येथील रहिवासी वकील सुधीर कुमार ओझा (Sudhir Kumar Ojha) यांनी फिर्याद दिली आहे. या याचिकेवर न्यायालय सुनावणी करेल की नाही याचा निर्णय 24 मार्चला होईल.

सुधीर ओझा यांनी आरोप केला आहे की, चीनने जागतिक महासत्ता बनण्यासाठीचे  षडयंत्र म्हणून, तसेच यासाठी कट रचनेचा भाग म्हणून कोरोनाला मुद्दाम जन्म दिला. 1981 मध्ये प्रकाशित झालेल्या 'आइज ऑफ डोकेन्स' पुस्तकात हे उघड झाले आहे. कोरोना व्हायरस चीनच्या वुहान शहरातील एका लॅबमध्ये छुप्या पद्धतीने तयार केला गेला व चीन या गोष्टीचा उपयोग जगाशी लढण्यासाठी एक शस्त्र म्हणून करेल असे या पुस्तकात लिहिलेले आहे. (हेही वाचा: मध्य रेल्वेने रद्द केल्या अनेक रेल्वे; डेक्कन एक्सप्रेस, निझामाबाद एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेसचा समावेश, जाणून घ्या पूर्ण यादी)

एक कट म्हणून चीनने कोरोना व्हायरसचा वापर करून घेतला. या विषाणूमुळे सध्या लाखो लोक संक्रमित झाले आहेत, तर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्हावेत म्हणून चीनने हे मुद्दाम घडवून आणले असे वकिलांचे म्हणणे आहे. कलम 269, 270, 109, 120बी अन्वये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान सध्या भारतात कोरोना व्हायरसच्या एकून 137 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif