Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारीस मनाई, पंतप्रधान मोदींनी सांगितल कारण
कुनो नॅशनल पार्क मध्ये काही महिने जंगल सफारीस बंदी असेल असं पंतप्रधान मोदींनी सांगितल आहे.
नामिबियातून (Namibia) 8 चित्ते मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते आज उद्यानाच्या आत बांधलेल्या एका विशेष प्लॅटफॉर्मवरून (Platform) तीन बॉक्स (Box) उघडत आणि आठ चित्त्यांना क्वारंटाइन एन्क्लोजरमध्ये सोडण्यात आले आहे. तसेच खुद्द पंतप्रधान मोदींनी (PM Modi) या चित्त्यांचे छायाचित्र टीपले आहेत. भारतात 70 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चित्ते परतले आहे. नामिबिया येथून आठ चित्त्यांचं भारतात (India) आगमन झालं आहे. हे आठ चित्ते मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) ठेवण्यात आले आहेत. 1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. त्यानंतर यंदा 2022 मध्ये हा प्रोजेक्ट चित्ता पूर्णत्वास आला आहे. या प्रोजेक्ट चित्ता साठी भारत सरकारने सुमारे 90 ते 92 कोटी खर्च केल्याचं चर्चा आहे.
तरी कुनो नॅशनल पार्कमधील (Kuno National Park) चीता पाहण्यासाठी लोकांना संयम बाळगावा लागणार आहे. चित्ते बघण्यासाठी भारतीयांना काही महिने वाट पहावी लागणार आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) देशातील जनतेला संबोधताना म्हणाले भारतात (India) नुकतेच आगमन झालेले हे चित्ते सध्या देशात नवीन आहेत. त्यांना कुनो नॅशनल पार्कला त्यांचे घर बनवता यावे, त्यांनी येथे रुळायला हवे. यासाठी चित्त्यांना काही महिन्यांचा कालवधी देणं गरजेचं आहे,म्हणून कुनो नॅशनल पार्क मध्ये काही महिने जंगल सफारीस बंदी असेल असं पंतप्रधान मोदींनी (PM Modi) सांगितल आहे. (हे ही वाचा:- PM Narendra Modi's Birthday: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार 2 ग्रॅम सोन्याची अंगठी)
दरम्यान पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या असुन नामिबिया (Namibia) सरकारचे आभार मानले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, अनेक दशकांपूर्वी जैवविविधतेचा जुना दुवा तुटला होता पण आता चित्त्याच्या आगमनानं आता आपल्याला तो पुन्हा जोडण्याची संधी आहे. तसेच देशातील निर्गप्रेमीसाठी ही आनंदाची बातमी असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच 1952 मध्ये देशातून चित्ते नामशेष झाले होते पण तेव्हापासून त्याबाबतीत कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाही. तरी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी चित्त्यांचं आगमन ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.