Omicron पासून बचाव करण्यासाठी भारतात दिली जाणार लसीचा बूस्टर डोस? आरोग्य मंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर
परंतु आता ओमीक्रॉन पासून बचाव कसा करायचा असा एकच प्रश्न सर्वांना पडत आहे.
कोरोना व्हायरसचा नवा वेरियंट ओमीक्रॉनचे (Omicron) भारतात रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आता ओमीक्रॉन पासून बचाव कसा करायचा असा एकच प्रश्न सर्वांना पडत आहे. याच प्रश्नावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी असे म्हटले की, लोकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. परंतु यावर निर्णय वैज्ञानिकांच्या सल्ल्यानंतर घेतला जाणार आहे. त्याचसोबत लहान मुलांचे लसीकरण कधीपर्यंत करायचे याबद्दल ही निर्णय घेतला जाईल.
ज्या देशांना प्रभावित कॅटेगरी मध्ये टाकण्यात आले आहे तर तेथून येणाऱ्या 16 हजार प्रवाशांची कोरोनाची चाचणी केली आहे. यामध्ये 18 हजार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह रिपोर्ट्समध्ये त्यांना कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत.(Omicron: देशात कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' व्हेरिएंटमुळे येणार तिसरी लाट? सरकारने दिले स्पष्टीकरण)
लसीच्या बूस्टर डोसबद्दल टॉप जीनोम साइंटिस्ट यांनी असे म्हटले की, 40 वर्षावरील सर्वांना तो दिला पाहिजे. परंतु ज्यांना अधिक धोका आहे त्यांच्यावर सर्वाधिक लक्ष असणार आहे. इंडियन सार्स कोविड12 जेनेटिक कंसोर्शियमच्या बुलेटिनमध्ये बूस्टर डोसची सिफारीश करण्यात आली आहे.
देशातील कोविड टास्क फोर्सचे चेअरमॅन डॉ. एनके अरोडा यांनी असे म्हटले की, सरकार गंभीर रोग आणि कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी बूस्टर डोसची पॉलिसी आणणार आहे. नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ही पॉलिसी दोन आठवड्यात तयार करणार आहे. NTGA देशातील 44 कोटी मुलांच्या लसीकरणासाठी सुद्धा नवी पॉलिसी आणणार आहे.