Medical Robot: पटना येथील इंजिनियरींगच्या विद्यार्थीनीने तयार केला रोबोट; कोरोना रुग्णांच्या सेवेत करणार डॉक्टरांची मदत

आकांक्षा कुमारी असे या विद्यार्थीनीचे नाव आहे.

Patna engineering student developed a robot to help doctors (Photo Credits: Twitter)

पटना (Patna) येथील एका 22 वर्षीय इंजिनियरींगच्या विद्यार्थीनीने डॉक्टरांच्या मदतीसाठी एक रोबोट तयार केला आहे. आकांक्षा कुमारी (Akanksha Kumari) असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. आकांक्षाने छत्तीसगढ़च्या बीआयटी दुर्गमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिग मध्ये पदवी संपादन केली आहे. कोरोना आणि अन्य रुग्णांवर उपचार करताना हा मेडिकल रोबोट (Medical Robot) डॉक्टरांना मदत करेल. मेडी रोबोट असे या रोबोटचे नाव असून आकांक्षाने वडीलांच्या मदतीने हा रोबोट तयार केला आहे. दोघांनीही मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये यावर काम सुरु केले होते.

याबद्दल आकांक्षाने सांगितले की, माझ्या वडीलांनी सॉफ्टवेअर आणि अन्य सुविधांवर काम करत हार्डवेअरची व्यवस्था करुन दिली. मेडी-रोबोट कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत करेल. तसंच यामुळे सोशल डिस्टसिंगचा नियमही पाळला जाईल. कोविड-19 संकटाच्या काळात अनेक डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी काहीतरी करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि मेडी-रोबोटची निर्मिती झाली. (Air Purifier Robot: कानपूर येथील शालेय विद्यार्थ्याने विकसित केला हवा शुद्ध करणारा अनोखा रोबोट; 'ही' आहे खासियत)

पहा फोटोज:

डॉक्टर्स, आरोग्य सेवक आणि कोरोना रुग्ण किंवा इतर रुग्णांमधील दुवा म्हणून मेडी रोबो काम करेल. या रोबोच्या निर्मितीसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचेही तिने पुढे सांगितले. विशेष म्हणजे केंद्रीय आयटी आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासमोर आकांक्षाने या रोबोचे प्रदर्शन केले. तसंच राज्य आणि केंद्र सरकारने या रोबोच्या वापरासाठी परवानगी द्यावी, अशी तिची इच्छा आहे. तिने या रोबोच्या पेटेंटसाठी देखील अर्ज केला आहे.

यात-360० हाय-रिझोल्यूशन नाईट व्हिजन कॅमेरा आहे. त्याच्या विशेष डिजिटल वैशिष्ट्यांमध्ये ऑक्सिजनचे स्तर, बीपी, शरीराचे तापमान, साखरेची पातळी, हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती मोजण्याचे तंत्र आहे.