पतंजली कंपनीचे दूध विक्री क्षेत्रात पदार्पण, अमुल व मदर डेरीच्या तुलनेत आकारणार कमीत कमी दर

यापुढे अमूल व मदर डेरी सारख्या कंपन्यांच्या तुलनेत कमीत कमी दरात दूध विक्री करणार असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे

Patanjali launches Milk At Cheap Rate (Photo Credits: Twitter)

अमूल (Amul)  व मदर डेरी (Mother Dairy)  कंपनीने काही दिवसांपूर्वीच दुधाचे दर प्रती लिटर मागे दोन रुपयाने वाढवले होते. यामुळे अगोदरच महागाईने त्रासलेल्या जनतेच्या खिशाला वाढीव कात्री लागण्याची चिन्हे दिसत होती. मात्र योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी या प्रश्नावर तोडगा काढला आहे. पतंजलीच्या उत्पादनात यापुढे दूध व अन्य दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्याची घोषणा सोमवारी रामदेव बाबांनी केली. पतंजली (Pantanjli) दूध, दही, लस्सी, ताक आणि पनीर या नव्या प्रोडक्ट्सचं रामदेव बाबांनी सोमवारी अनावरण केलं. हे पदार्थ किमतीला कमी आणि गुणवत्तेत भारी असल्याचा दावा पतंजलीतर्फे करण्यात आला आहे.

सध्या देशभरात प्रक्रिया केलेल्या दुधाची प्रचंड मागणी लक्षात घेता पतंजली 40 रुपये प्रतीलिटर दराने दूध विक्री करणार आहे. इतर कंपन्यांशी तुलना करता पतंजलीचं दूध चार रुपये स्वस्त असणार आहे’, अशी माहिती रामदेव बाबा यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.पतंजली कंपंनी ही सुरवातीपासूनच स्वस्त व नैसर्गिक उत्पादनांची विक्री करण्याचा दावा करते त्यानुसार हे नवे पदार्थ देखील इतर ब्रॅंड्स पेक्षा ते सहा रुपये कमी किमतीत विकली जातील असे समजत आहे. अमूल दूध महागणार, महाराष्ट्र सह 6 राज्यांमध्ये उद्यापासून दूधासाठी 2 रूपये अधिक मोजावे लागणार 

पतंजलीच्या नव्या उत्पादनाचे आखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे दूध थेट शेजारी व ग्रामीण भागातून खरेदी केले जाणार असून याचा नफा हा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल. या योजनेचा फायदा तब्बल 15 हजार शेतकऱ्यांना होनार असल्याचा दावा रामदेव यांनी केला आहे.

सध्या स्वस्त दुग्ध उत्पादने महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर व हरियाणा राज्यांमध्ये  दिवसाला चार लाख लिटर दूध पुरवठा करणं आमचं मुख्य लक्ष्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.येत्या काळात पतंजली हर्बल मिल्क आणि फुल क्रीम मिल्क लाँच होणार आहेत. ‘