पतंजलि स्वसरी कोरोना किटवर कोणतेही निर्बंध नाही; संपूर्ण देशात विक्रीसाठी उपलब्ध- योगगुरु बाबा रामदेव

मात्र आता या वादावर पडदा पडला असून कोरोनीलच्या विक्रीतील अडसर देखील दूर झाला आहे.

Baba Ramdev, chief of Patanjali Ayurved | File Image | (Photo Credits: IANS)

पतंजलि आयुर्वेदकडून (Patanjali Ayurved) निर्माण करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसवरील कोरोनील (Coronil) या औषधावर गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र आता या वादावर पडदा पडला असून कोरोनीलच्या विक्रीतील अडसर देखील दूर झाला आहे. पतंजलि आयुर्वेदाच्या स्वसरी कोरोनिल किट (Patanjali Swasari Coronil Kit) वर आता कोणतेही निर्बंध नसून हे किट संपूर्ण देशात विक्रीसाठी उपलब्ध आहे. अशी माहिती योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी आज (1 जुलै 2020) दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले, "आयुष मंत्रालय आणि पतंजलि यांनी एकत्रितपणे कोविड-19 च्या संसर्ग नियंत्रण मिळण्यासाठी भरीव कार्य केले आहे. पतंजलिने योग्य दिशेने कामाला सुरुवात केली. आम्ही आयुष मंत्रालयाशी संलग्न असणाऱ्या राज्याच्या विभागाकडून या औषधांसाठी परवाना मिळवला आहे." (पतंजलि च्या COVID 19 वरील औषधांमुळे 7 दिवसांत 100% रिकव्हरी, 45 रुग्ण कोरोनामुक्त; आयुष मंत्रालयाला सादर केलेल्या रिपोर्ट्समध्ये दावा)

पतंजलिने कोविड-19 नियंत्रणासाठी काम केले असून या औषधांमध्ये मेटालिक आयटम्स नाहीत. परंतु, यासाठी उपचार हा शब्द वापरता येणार नाही, असे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले. आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल कोणतंही दुमत नाही. मात्र आता कोरोनिल, स्वशारी, गिलोय, तुळशी, अश्वगंधा औषधांच्या विक्रीवरील बंधनं हटली आहेत. ही औषधे संपूर्ण देशात विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यावर आता कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे मी आयुष मंत्रालय आणि मोदी सरकारचे आभार मानतो, असेही ते पुढे म्हणाले.

कोरोनील आणि स्वसारी ही आयुर्वेदिक औषधे पतंजलिने गेल्या आठवड्यात लॉन्च केली. तसंच याच्या क्लिनिकल ट्रायल्सचे उत्तम रिझल्ट असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र त्यावर उत्तराखंड आयुर्वेद डिपार्टमेंटने आक्षेप घेतला होतो. तसंच आयुष मंत्रालयाकडून कोरोनीलच्या जाहिराती आणि प्रसिद्धीवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान 3 दिवसांत 67% रिकव्हरी झाली असून 7 दिवसांत 100% रिकव्हरी दिसून आली. त्यामुळे 45 रुग्ण कोरोनामुक्त झाले, असे आयुष मंत्रालयाला कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या रिपोट्समध्ये म्हटले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif