Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार साखरपुडा- Report
त्यांचे कुटुंबीयही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. परिणीती आणि राघव दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातले असले तरी, त्यांच्या समान आवडीनिवडी आणि शैक्षणिक पार्श्वभूमीद्वारे ते जवळ आल्याचे बोलले जात आहे.
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आम आदमी पक्षाचे लोकसभा खासदार संजीव अरोरा यांनी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे अभिनंदन केले. अरोरा यांच्या मेसेजनंतर सोशल मीडियावर लग्नाबाबत अटकळ सुरू झाली. मात्र, या सगळ्या गोष्टींनंतरही दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केले नाही.
आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच दोघेही एंगेज होणार आहेत, ज्याची तारीख निश्चित झाली आहे. दोघांचे कुटुंबीय सध्या दिल्लीत साखरपुड्याच्या तयारीत व्यस्त आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, परिणीती चोप्राच्या जवळच्या मैत्रिणीने माहिती दिली आहे की, परिणीती आणि राघव लवकरच एंगेजमेंट करणार आहेत.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा एंगेजमेंट सोहळा दिल्लीत होणार आहे. सध्या अभिनेत्री तयारीसाठी दिल्लीला पोहोचली आहे. अभिनेत्रीला घेण्यासाठी राघव चढ्ढा स्वतः दिल्ली विमानतळावर आले होते. अवघ्या काही दिवसांत परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा त्यांच्या नात्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. या एंगेजमेंटमध्ये फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्रा देखील तिचा पती निक जोनाससोबत या एंगेजमेंटचा भाग असणार आहे. प्रियांका केवळ परिणीतीच्याच साखरपुड्यासाठी भारतात आल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा: Parineeti Chopra - Raghav Chadha लग्नाच्या प्रश्नावर परिणीतीने लाजत टाळलं उत्तर देणं)
परिणीती आणि राघव गेल्या काही काळापासून डेटिंग करत असल्याची माहिती आहे. त्यांचे कुटुंबीयही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. परिणीती आणि राघव दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातले असले तरी, त्यांच्या समान आवडीनिवडी आणि शैक्षणिक पार्श्वभूमीद्वारे ते जवळ आल्याचे बोलले जात आहे. दोघांनी ब्रिटनमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे.