Abhinandan Varthaman: विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडले नाही तर भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तान थरथर कापत होता; पाकिस्तानी संसद अयाज सादिक यांनी केला खुलासा

आपण जर भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांनी याला सोडले नाही तर भारत हल्ला करेल या भीतीने विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांनी अभिनंदन ला सोडा अशी मागणी केली होती.

File image of Wing Commander Abhinandan Varthaman | (Photo Credits: IANS)

पाकिस्तानने भारतावर अनेकदा वार केले आहेत, करत आहे मात्र भारतीय सैन्याची हिंमत थोडीशीही डगमगली नाही. त्यामुळे भले पाकिस्तान परमाणु हल्ल्याची धमकी देवो वा युद्धाची मात्र आजही पाकिस्तान भारताची ताकद पाहून थर थर कापतो. पाकिस्तानच्या या भीतीबाबत पाकिस्तानी संसद अयाज सादिक (Ayaz Sadiq) यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यावेळी आपण जर भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांनी याला सोडले नाही तर भारत हल्ला करेल या भीतीने विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी  (Shah Mahmood Qureshi) यांनी अभिनंदन ला सोडा अशी मागणी केली होती.

अभिनंदनच्या सुटकेवर शाह महमूद कुरैशी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान भारत हल्ला करेल या दहशतीखाली होते. याबाबत माहिती देताना अयाज सादिक म्हणाले की, शाह महमूद कुरैशी त्या बैठकीत होते जेथे इमरान खान यांनी येण्यास नकार दिला. शाह महमूद कुरैशी यांचे पाय कापत होते, त्यांच्या कपाळावर घाम आला होता. त्यावेळी कुरेशी म्हणाले होते, 'खुदा का वास्ता अभिनंदन को वापस उसके देश जाने दे, कारण त्याच रात्री 9 वाजता हिंदुस्ताना पाकिस्तानावर हल्ला करणार होता. मात्र असे काही झाले नाही.' विंग कमांडर अभिनंदन वर्थमान दुखापतींवर मात करून पुन्हा सेवेत रूजू; एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ सोबत उडवले मिग-21

दरम्यान 36 वर्षांच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याने पाकिस्तानी विमानांसह झालेल्या युद्धात आपल्या मिग 21 बाइसन विमानाने पाकिस्तानच्या अत्याधुनिक विमान एफ-16 चितपट केले होते. त्यानंतर अभिनंदन चे विमान कोसळले होते. मात्र त्यातून अभिनंदन विमानातून सुरक्षित बाहेर पडले होते. मात्र पॅराशूट मधून येऊन पाकिस्तानी क्षेत्रात उतरून त्यांना पकडले होते. मात्र 60 तासानंतर पाकिस्तानला वाघा बॉर्डरवरून भारतात पुन्हा पाठवावे लागले होते.