पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या US प्रवासासाठी पाकिस्तान कडून हवाई हद्द खुली करण्यास नकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या US प्रवासासाठी पाकिस्तान कडून हवाई हद्द खुली करण्यास नकार देण्यात आल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. येत्या आठवड्यात मोदी अमेरिकेच्या दौर्यावर आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या आगामी अमेरिका दौर्यासाठी पाकिस्तानकडे (Pakistan) त्यांच्या हद्दीतील एअरस्पेस (Airspace) खुलं करण्याच्या मागणीला फेटाळण्यात आलं आहे. या आठवड्यात 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमासाठी मोदी अमेरिकेत दाखल होणार आहेत. त्यासाठी पाकिस्तानकडे एअर स्पेस खुलं करण्यासाठी मागणी केली होती. मात्र आता ती नाकारल्याची माहिती पाकिस्तानमधील भारतीय उच्चालयाला दिल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा मोहम्मद कुरेशी (Shah Mehmood Qureshi) यांनी दिल्याचं ANI ने सांगितलं आहे. एएनआयच्या ट्वीटनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानासाठी पाकिस्तानचे एअरस्पेस खुले केले जाणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे. 'हाउडी मोदी' कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश; पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्रपती भारतीय समुदायाला संबोधित करणार
United Nations General Assembly च्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी 21-27 सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत. यापूर्वी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या 'आईसलॅंड' दौर्यासाठीदेखील पाकिस्तानने अशाचप्रकारे परवानगी नाकारली होती. महिन्याभरापूर्वी भारताने कश्मीरमध्ये कलम 370 हटवत विशेष राज्याचा दर्जा काढून घेत जम्मू कश्मीर आणि लद्दाख या दोन्ही प्रांतांना केंद्रशाशित प्रदेश जाहीर केले आहे. सध्या कश्नीरच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आला आहे. सध्या भारत-पाकमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. European Union Parliament चा कश्मीर प्रश्नावरून भारत- पाकिस्तान देशांना सबुरीचा सल्ला; संयमाने चर्चा करून तोडगा काढण्याचं आवाहन
ANI Tweet
दरम्यान कश्मीर प्रश्नी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बड्या देशांकडे मदत मागितली आहे. मात्र पाकिस्तानला पाठिंबा मिळत नसल्याने आता हा देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज युरोपियन युनियन संसदेमध्येही भारत- पाक संबंधांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळेस पाकिस्तानला फटकारत दोन्ही देशांनी संयम आणि शांततेने चर्चा करावी, यामधूनच मार्ग निघू शकतो असा सल्ला देण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)