Bilawal Bhutto Zardari India Visit: 12 वर्षांनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची भारत भेट, जाणून घ्या बिलावल भुट्टो यांची भेट का महत्त्वाची?

अशा परिस्थितीत रशिया आणि चीनसारख्या देशांची त्यांना गरज आहे. याशिवाय असे मानले जाते की SCO च्या सदस्य देशांना हे व्यासपीठ भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वाचा बळी बनावं असं वाटत नव्हतं त्यामुळेच बिलावल भुट्टो या बैठकीला येत आहेत.

Bilawal Bhutto Zardari | Twitter

गोव्यामध्ये 4 आणि 5 मे दिवशी Shanghai Cooperation Organization अर्थात SCO च्या विदेश मंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री Bilawal Bhutto Zardari देखील सहभागी होणार आहेत. बिलावल यांच्यामुळे सुमारे12 वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतामध्ये येणार आहे. 1947 साली भारत-पाक फाळणीनंतर दोन्ही देशांचे संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. पण अत्यंत नाजूक संबंध असताना आता बिलावलचं भारतामध्ये येणं सामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आता भारतामध्ये येणं अनेक अर्थाने विशेष आहे. बिलावल यांच्यापूर्वी 2011 मध्ये हिना रब्बानी खान भारतात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा यांची भेट घेतली होती.

बिलावल यांचं भारतात येण्यामागील कारण? 

बिलावल यांचं भारतात येण्यामागे Shanghai Cooperation Organization ची बैठक आहे. ज्यात पाकिस्तान सोबत रशिया आणि चीनचे पराराष्ट्र मंत्री देखील आहेत. यामध्ये बिलावल केवळ सहभागी होणार आहेत. त्यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत बातचीत करण्याचा कोणत्याही कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे दहशतवाद. दहशतवादावर चर्चा केल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. नुकतेच जयशंकर डॉमिनिकन रिपब्लिकच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, गेल्या दशकात भारताने 'शेजारी प्रथम' हे धोरण स्वीकारले आहे, परंतु पाकिस्तान त्याला अपवाद आहे कारण तो सीमापार दहशतवादाला पाठिंबा देतो.

SCO म्हणजे काय? 

SCO ची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. त्यानंतर चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी 'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन'ची स्थापना केली. यानंतर जातीय आणि धार्मिक तणाव दूर करण्याबरोबरच व्यवसाय आणि गुंतवणूक वाढवणे हेही उद्दिष्ट बनवण्यात आले शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये 8 सदस्य देश आहेत. यामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. याशिवाय इराण, अफगाणिस्तान, बेलारूस आणि मंगोलिया हे चार निरीक्षक देश आहेत. Inflation Rate: पाकिस्तानच्या महागाईने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड; पोहोचला 36.4 टक्क्यांच्या उच्चांकावर, श्रीलंकेला टाकले मागे .

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत रशिया आणि चीनसारख्या देशांची त्यांना गरज आहे. याशिवाय असे मानले जाते की SCO च्या सदस्य देशांना हे व्यासपीठ भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वाचा बळी बनावं असं वाटत नव्हतं त्यामुळेच बिलावल भुट्टो या बैठकीला येत आहेत. भुट्टो यांना बैठकीच्या माध्यमातून सदस्य देशांशी व्यापार वाढवायचा आहे. ज्याद्वारा अर्थव्यवस्था मजबूत होईल.

2017 मध्ये full Member State म्हणून या संघटनेत सामील झाल्यानंतर भारताने प्रथमच SCO चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. भारताच्या अध्यक्षपदाचा कालावधी दिल्लीत जुलैमध्ये होणाऱ्या SCO प्रमुखांच्या शिखर परिषदेत संपेल.