Online Gaming App: काय सांगता? व्यक्तीने ऑनलाइन गेमिंग अॅपवर गुंतवले 49 रुपये; रातोरात जिंकले 1.5 कोटी

यामध्ये एकूण 6 लाख रुपये कर कापला जाऊन, 14 लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा केले जातील.

Jackpot Lottery (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बरवानी (Barwani) जिल्ह्यातील एका ड्रायव्हरने रविवारी ऑनलाइन गेमिंग अॅपमध्ये (Online Gaming App) अवघे 49 रुपये गुंतवून 1.5 कोटी रुपये जिंकले आहेत. गेमिंग अॅपवर 49 रुपये श्रेणीमध्ये व्हर्च्युअल क्रिकेट टीम तयार करून प्रथम स्थान मिळवून त्याने ही रक्कम जिंकली आहे. शहाबुद्दीन मन्सूरी असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने दावा केला की तो गेल्या दोन वर्षांपासून अशा ऑनलाइन क्रिकेट खेळांमध्ये संघ तयार करून आपले नशीब आजमावत आहे.

रविवारी खेळल्या गेलेल्या कोलकाता आणि पंजाब यांच्यातील आयपीएल सामन्यातही त्याने क्रिकेट संघ बनवला, ज्याने त्याचे नशीब बदलले. व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या शहाबुद्दीनचे म्हणणे आहे की, तो दोन वर्षांपासून हा खेळ खेळत आहे आणि आता त्याने या सामन्यात संघ बनवून दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.

शहाबुद्दीनने Dream11 वर ही मोठी रक्कम जिंकली आहे. याशिवाय, सध्या बाजारात अशी इतर अनेक अॅप्स आहेत, जिथे तुम्ही 11 खेळाडूंची टीम बनवून बक्षीस जिंकू शकता. शहाबुद्दीनने 49 रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये संघ बनवला होता, अशा प्रकारे पैशांच्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये संघ बनवता येतो. Dream11 सारखी अॅप्स हे एक काल्पनिक स्पोर्ट्स अॅप आहेत, जिथे तुम्ही देशात किंवा परदेशात होणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या मॅचवर आधारित तुमचा स्वतःचा संघ तयार करू शकता. जर तुमच्या संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर तुमची जिंकण्याची शक्यता खूप वाढते. (हेही वाचा: Indian Economy: भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थे पैकी एक राहिल - ऑगस्टे टॅनोकोआमे)

आतापर्यंत शहाबुद्दीनने त्याच्या अॅप वॉलेटमधून दीड कोटी रुपयांपैकी 20 लाख रुपये काढले आहेत. यामध्ये एकूण 6 लाख रुपये कर कापला जाऊन, 14 लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा केले जातील. मध्य प्रदेशातील सेंधवा येथे भाड्याच्या घरात राहणारा शहाबुद्दीन जिंकलेल्या पैशातून स्वत:चे घर बांधण्याचा विचार करत आहे. उरलेल्या रकमेतून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचेही त्याचे स्वप्न आहे.