Onion Price Hike: लग्नाच्या आहेरात कांदा लसूण हिट; वर-वधूने सुद्धा एकमेकांना दिले कांदागुच्छ
वाराणसी येथे झालेल्या एका लग्नात वरवधूने एकमेकांना पुष्पगुच्छ देण्याऐवजी चक्क कांदा आणि लसणाचा गुच्छ करून दिला होता, इतकेच नव्हे तर लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी सुद्धा आहेरात कांदा (Onion) लसूण (Garlic) गिफ्ट केल्याचे समजत आहे
देशभरात कांद्याच्या दराने (Onion Price) एकाएकी अशी काही उसळी घेतली आहे की यापूर्वी डोळ्यातून जे अश्रू कांदा चिरताना येत होते ते आता नुसते भाव ऐकून तरळू लागले आहेत. या भाववाढीला विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झालेल्या एका लग्नात वरवधूने अनोखा मार्ग निवडला होता. ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या नवविवाहित दाम्पत्याने लग्नात एकमेकांना पुष्पगुच्छ देण्याऐवजी चक्क कांदा आणि लसणाचा गुच्छ करून दिला होता, इतकेच नव्हे तर लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी सुद्धा आहेरात कांदा (Onion) लसूण (Garlic) गिफ्ट केल्याचे समजत आहे. लग्नाच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत कांदा भाव वाढीचा प्रश्न पोहचावा याकरिता हा मार्ग निवडल्याचे वाढू वराने सांगितले. (किरकोळ बाजारात कांदा 150 रुपये प्रति किलो, नववर्षात दिलासा मिळण्याची शक्यता)
सध्या या लग्नाची उत्तर प्रदेशात बरीच चर्चा होत असल्याने समाजवादी पक्षाचे नेते कमल पटेल यांने सुद्धा यावर आवर्जून भाष्य केले. सध्या कांदा हा काही ठिकाणी 120 रुपये प्रतिकिलो वर पोहचला आहे. काहीच दिवसात हे भाव सोन्याच्या किंमतीला भिडतील की काय अशी सुद्धा शक्यता आहे. अशावेळी लोकांपर्यंत हा या दरवाढीचा प्रभाव पोहचवण्यासाठी हा उत्तम मार्ग निवडल्याचे म्हणत पटेल यांनी वर वधूचे कौतुक केले. (कांद्याचे दर होणार आणखी कमी; जाणून घ्या आजचा कांद्याचा दर)
ANI ट्विट
दरम्यान, काहीच दिवसात कांद्याची आयात झाल्यावर भाव कमी होणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत आहेत. तसेच मुंबईसह महाराष्ट्रात काही भागात कांद्याचा दर शंभरीच्या आत देखील येऊ लागला आहे. मात्र उत्तर प्रदेश आणि मुख्यतः वाराणसी मध्ये अजूनही दर वाढ कायम असल्याचे समाजवादी म्हणणे आहे.