Odisha Train Accident: ओडिशा येथील रेल्वे अपघातात 237 ठार, 900 हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची भीती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बालासोरला रवाना
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या 237 वर पोहोचली आहे. तर जखमींची संख्या 900 च्याही पुढे गेली आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मदत आणि बचाव कार्य सुरुच आहे.
बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ट्रेनला ( Bengaluru-Howrah Express trains ) शुक्रवारी (2 जून) झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आता प्रचंड वाढली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या 237 वर पोहोचली आहे. तर जखमींची संख्या 900 च्याही पुढे गेली आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मदत आणि बचाव कार्य सुरुच आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त ट्रेनच्या डब्यांमध्ये अद्यापही काही प्रवासी मोठ्या प्रमाणावर अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या बाजूला रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोरोमंडल एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील बंगालच्या शालीमार स्टेशन आणि चेन्नई दरम्यान चालते. या ट्रेनची बहनगा रेल्वे स्थानकाजवळ ही टक्कर झाली. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाडीचाही मोठा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 12864 बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचे अनेक डबे बालेश्वरजवळ रुळावरून घसरले आणि लगतच्या रुळावर पडले. रुळावरून घसरलेले हे डबे १२८४१ शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले आणि त्याचेही डबेही उलटले.
व्हिडिओ
अलिकडील काळात भारतात झालेल्या सर्वात मोठा रेल्वे अपघात, असे या अपघाताचे वर्णन केले जात आहे. हा अपघात ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्टेशनजवळ, कोलकात्यापासून सुमारे 250 किमी दक्षिणेस आणि भुवनेश्वरच्या 170 किमी उत्तरेस, शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास घडला.
व्हिडिओ
अपघातस्थळी मदत आणि बचाव कार्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), ओडिशा डिझास्टर रॅपिड अॅक्शन फोर्स (ODRAF), अनेक फायर युनिट्स आणि रुग्णवाहिकांना बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्कराला सामील करण्यात आले आहे.
व्हिडिओ
प्राप्त माहितीनुसार, मदत आणि बचाव कार्यासाठी सुमारे 200 रुग्णवाहिका तैनात (108 पैकी 167, इतर 20+ सरकारी रुग्णवाहिका) करण्यात आल्या आहेत. शिवाय 45 फिरती आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय सुमारे 50 अतिरिक्त डॉक्टरांची जमवाजमव करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बालासोर येथील अपघातस्थळी पोहोले आहेत.