NSE: 'एनएसई'च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरी Income Tax विभागाचे छापे, हिमालयातील बाबाला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax) छापा टाकले आहे. चित्रा रामकृष्ण यांनी एनएसईमधील गोपनीय मामहिती एका बाबाला पुरविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax) छापा टाकले आहे. चित्रा रामकृष्ण यांनी एनएसईमधील गोपनीय मामहिती एका बाबाला पुरविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, या बाबाच्या सल्ल्याने त्या आपला कारभार करत असत. एनएसईमधील अनेक महत्त्वाचे निर्णय त्या बाबाचा सल्ला घेऊन करत असल्याचाही आरोप आहे. छाप्या दरम्यान, तत्कालीन ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर असलेल्या आनंद सुब्रमण्यम यांच्या घराच्या परीसरातही शोधमोहीम झाल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, या सर्वांनी करचोरी केल्याच्या आरोपाच्या चौकशीसाठी हे छापे टाकण्या आले आहेत.
सेबीने केलेल्या चौकशीत एनएसईच्या माजी सीईओ चित्रा यांनी माहिती दिली की, त्या शेअर बाजारातील विविध प्रकरणांमध्ये हिमालयातील एका अज्ञात योगीसोबत चर्चा करत असत. एनएसईतील अतिशय संवेदनशील माहिती व्यस्थेबाहेरील व्यक्तीला शेअर केल्याने वाद निर्माण झाला आहे. (हेही वाचा, Stock Market: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी Roller Coaster video शेअर करत दाखवली शेअर मार्केटची अवस्था)
हे प्रकरण आनंद सुब्रमण्यम यांना मुख्य रणनीतिकार, सल्लागाराच्या रुपात नियुक्ती आणि त्यांच्या पदाचे नाव बदलून चीफ ऑपरेटींग ऑफिसर आणि एमडीचे सल्लागार असे केल्याने कंपनी संचालन वादात अडकले आहे. सेबीच्या आदेशानुसार एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत एनएसईच्या एमडी एवं सीईओ पदावर राहिलेल्या रामकृष्ण या हिमालयात असलेल्या कथीत योगीच्या संपर्कात होत्या. त्या योगीला त्या 'शिरोमणी' म्हणत असत. या प्रकरणात एनएसईच्या माजी प्रमुखांचा दावा आहे की, हा योगी हिमालयातील पर्वतरांगामध्ये राहतात. पाठिमागील 20 वर्षांपासून ते त्यांना सल्ला देत आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)