No Mask, No Fuel योजनेअंतर्गत कोरोना व्हायरसचा खात्मा होईपर्यंत मास्क नसल्यास पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही

मात्र आजपासून काही विभागात लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजारांच्या पार गेला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. मात्र आजपासून काही विभागात लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजारांच्या पार गेला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पेट्रोल पंपवर नागरिकांना मास्कशिवाय पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही आहे. पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी असे म्हटले आहे की, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता पाहता हा निर्णय घेतला आहे. तसेच हा निर्णय देशभरातील सर्व पेट्रोलपंपावर लागू होणार आहे. लॉकडाउनच्या दरम्यान अत्यावश्यक सेवासुविधांमध्ये पेट्रोल पंप यांचा सुद्धा समावेश आहे.

पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता No Mask, No Fuel योजना सुरु करण्यात आली आहे. म्हणजेट पेट्रोल किंवा डिझेल वाहनामध्ये भरण्याच्या वेळी तु्म्हाला मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. तसेच कोणत्याही कामासाठी बाहेर पडल्यास मास्क घालणे ही अत्यावश्यक आहे. ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जर एखाद्या वाहनधारकाने मास्क न घालता पेट्रोल पंपावर आल्यास त्याला इंधन दिले जाणार नाही आहे.(दिल्ली: COVID-19 बाधित पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेले 16 लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह) 

ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन यांच्या द्वारे नो मास्क, नो फ्यूल नियम राजधानी दिल्लीत फॉलो केला जात आहे. हा नियम देशभरातील कोरोनाच्या परिस्थितीचा खात्मा होत नाही तो पर्यंत कायम राहणार आहे. दरम्यान भारतात कोरोनाबाधित 17656 रुग्ण आणि 559 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2842 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.