Nita Ambani BHU News: नीता अंबानी बनारस हिंदू विद्यापीठात देणार शिक्षणाचे धडे? Reliance Industries प्रवक्त्यांकडून खुलासा

विद्यार्थ्यांनी कुलगुरुंवर बीएचयू हे उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप केला. तसेच, कुलगुरुंवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली.

Nita Ambani | (Photo Credits: Twitter/ANI

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) समुहाच्या कार्यकारी निदेश आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा निता अंबानी (Nita Ambani) बनारस हिंदू विद्यापीठात (Banaras Hindu University) व्हिडिजिटंग प्रोफेसर म्हणून जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकले होते. दरम्यान, या वृत्तावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी बुधवारी (17 मार्च) खउलासा केला. या खुलाशात प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, नीता अंबानी यांना बीएचयू (BHU) द्वारा व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून काम करण्याचा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही. याबाबतचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. रियासन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रवक्यांनी म्हटले आहे की, बनारस हिंदू विद्यापीठात व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून नीता अंबानी जाणार असल्याची बातमी निराधार आहे. निता अंबनी यांना विद्यापीठाकडून असा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव मिळाला नाही.

प्रसारमाध्यमांतून नुकतेच वृत्त आले होते की, बनारस हिंदू विद्यापीठात सामाजिक विद्याना विभागाकडून नीता अंबानी यांना व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून येण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी निता अंबानी यांनी मुंबई विद्यापीठातून बिकॉम केले आहे. त्यांनी 2014 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजे कार्यकारी निदेश बनविण्यात आले. सन 2010 मध्ये त्यांनी रिलायनिस फाऊंडेशनची स्थापना केली. सांगितले जात आहे की एक सफल उद्योजिका म्हणून त्यांना हे निमंत्रण पाठविण्यात आले होते. (हेही वाचा, International Women's Day: खास महिला सशक्तीकरणासाठी Nita Ambani यांनी लॉन्च केले 'Her Circle' डिजिटल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म; जाणून घ्या कशी मिळेल मदत)

नीता अंबानी बीएचयूमध्ये व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून येण्यासाठी प्रस्ताव दिल्याच्या बातम्या आल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध दर्शवला. विद्यार्थ्यांनी कुलगुरुंवर बीएचयू हे उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप केला. तसेच, कुलगुरुंवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली.

सामाजशास्त्र विभागाचे डीन प्रोफेसर कौशल किशोर मिश्रा यांनी म्हटले की, नीता अंबानी यांनी हा प्रस्ताव तोंडी स्वरुपात स्वीकारला आहे. तसेच, मालवीय यांच्यापासूनची परंपरा आहे की बीएचयू हे नेहमीच अनेक मोठ्या उद्योगपतींसोबत जोडले गेले आहे. याच श्रृखलेत अंबानी यांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचे बीएचयूशी जोडले जाणे हे रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.