Nirmala Sitharaman Press Conference IMP Points: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
देशाची अर्थव्यवस्था प्रगती करत आहे असे सीतारमण म्हणाल्या. त्यांनी यासाठी आरबीआयचा दाखला दिला. या वेळी सीतारमण यांनी काही घोषणाही केल्या. आज सकाळपासूनच सीतारामण काय घोषणा करणाय याबाबत उत्सुकता होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे.
अर्थमंत्री निरमला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (12 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन देशातील अर्थव्यवस्थेबाबत आणि लॉकडाऊन नंतर देशभरात निर्माण झालेल्या स्थितीबाबत माहिती दिली. देशातील आर्थिक स्थिती सुधारत आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रगती करत आहे असे सीतारमण म्हणाल्या. त्यांनी यासाठी आरबीआयचा दाखला दिला. या वेळी सीतारमण यांनी काही घोषणाही केल्या. आज सकाळपासूनच सीतारामण काय घोषणा करणाय याबाबत उत्सुकता होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे. (Nirmala Sitharaman Press Conference IMP Points)
पीएमआई इंडेक्स
देशातील कोविड 19 रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे. एकेकाळी 10 लाखांच्या घरात असलेली रुग्णसंख्या 4.89 लाखांवर आली आहे. देशातील मृत्यूदरात घट होऊन ती 1.74 टक्के इतकी झाला आहे. पीएमआय ऑक्टोबर महिन्यात 58.9 इतका राहिला आहे. जो गेल्या महिन्यात 54.6 इतका होता. (हेही वाचा, Nirmala Sitharaman: मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता, अर्थमंत्री निर्मला सीतारमण घेणार पत्रकार परिषद)
जीएसटी
देशातील उर्जेची मागणी 12 टक्क्यांनी वाढली आहे. तर वस्तू सेवा कर (जीएसटी) महसूल 10 टक्क्यांनी वाढला आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की देशातील रेल्वे वाहतुकीतही 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. (हेही वाचा, Atmanirbhar Bharat Rozgar Yojana: आत्मनिर्भर भारत 3 अंंतर्गत रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मोदी सरकारची नवी योजना जाहीर; पहा कुणाला फायदे!)
बँकांचे कर्ज
देशातील बँकांच्या कर्जप्रक्रियेतही 5.1 टक्के वाढ झाली आहे. या आधी आगोदर सरकारने डोमेस्टीक व्यवहाराना चालना देण्यासाठी 10 आणखी क्षेत्रांसाठी प्रोत्साहन योजना मंजूर केली.
उत्पादन आधारी प्रोत्साहन योजना
रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन यांसारख्या उत्पादकांना याशिवाय औषध, वाहन, दूरसंचार, गारमेंट आदी क्षेत्रांना उत्पादन आधारी प्रोत्साहन योजना लाभदायी ठरेल असेही सीतारमण म्हणाल्या.
Domestic Manufacturing वाढविण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी दूरसंचार, वाहन आणि औषध अशा सुमारे 10 प्रमुख क्षेत्रांमध्ये उत्पादन आधारीत प्रोत्साहन (पीएलआय) योजनेस मंजूरी दिली आहे. या योजनेंतर्गत पुढच्या पाच वर्षाैंसाठी सुमारे 2 लाख कोटी रुपये कर्च केले जातील. पीएलआय योजनेचा लाभ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, यांसारख्या उत्पादन कंपन्या आमि इतरही काही उद्योगांना होणार आहे.