IPL Auction 2025 Live

नवा मोटार कायदा हा केवळ लोकांचे प्राण वाचावे यासाठी सरकारी तिजोरी भरण्यासाठी नव्हे- नितीन गडकरी

त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाचा आदर करावा असेही ते ANI शी बोलताना म्हणाले.

Nitin Gadkari (Photo Credits: ANI)

सरकारने लागू केलेल्या नवा मोटार कायद्यावरून (Motor Vehicle Act) सध्या काही नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत असून विरोधी पक्षांसह अनेक स्तरांतून सरकारवर कडाडून टीका केली जात आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय हा जनतेच्या हितासाठी असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) आपले मत व्यक्त केले आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते (Divakar Ravte) यांनी काही नव्या मोटार कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती दिली असली तरीही या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही नवी मोटार कायदा लागू केला तो सरकारची तिजोरी भरण्यासाठी नव्हे तर लोकांचे प्राण वाचविण्यासाठी. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाचा आदर करावा असेही ते ANI शी बोलताना म्हणाले.

लोकांचा जीव वाचवण्याची जबाबदारी सरकारची नाही का? या कायद्यामागे हीच भावना आहे. सरकारी तिजोरीत धन वाढवण्यासाठी दंडाची रक्कम वाढवणे असा सरकारचा हेतू नाही. सरकार उद्योगांसोबत आहे. वाहन निर्मिती उद्योग हे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे आणि विकास दरात याचे योगदान आहे. काळाच्या ओघात या क्षेत्रात सुधारणा होतील आणि याचे चांगले परिणाम दिसतील. मी अपेक्षा करतो की भारत वाहन निर्मिती उद्योगाचे प्रमुख केंद्र बनेल, असेही गडकरी म्हणाले.

ANI चे ट्विट:

हेही वाचा- सावधान! चप्पल आणि सँडल घालून दुचाकी चालविल्यास बसणार भुर्दंड; दुस-यांदा पकडले गेल्यास सरळ तुरुंगात रवानगी

या अगोदर या नव्या कायद्याचे समर्थन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, नव्या कायद्यातील दंडाची तरतूद ही सरकारी तिजोरी भरण्यासाठी करण्यात आलेली नाही तर, वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणाऱ्या रस्ते अपघातातील मृतांची संख्या रोखण्यासाठी करण्यात आली आहे. हेही वाचा- खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर, होईल 25,000 रुपये दंड, 3 वर्षे तुरुंगवास; जाणून घ्या New Traffic Rules in India 2019

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीला ओला-उबर टॅक्सी सेवा कारणीभूत असल्याचे विधान केल्याने अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर त्यांची बाजू घेत गडकरी म्हणाले होते की, अर्थमंत्र्यांच्या विधानाला माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने प्रसारित केले. त्यांनी म्हटले होते की, वाहन उद्योगातील मंदीच्या मागे अनेक कारणे आहेत. ओला, उबर टॅक्सीसेवा हे त्यांपैकी एक आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील मंदी मागील मोठे कारण आहे. कारण, संपूर्ण देशभरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली असल्याने त्याचा मंदीवर परिणाम झाला आहे.