Dehradun Murder: विवाहबाह्य संबंधातून नेपाळी महिलेची हत्या, लेफ्टनंट कर्नला अटक
त्याच्यावर नेपाळी महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. पलिसांनी सांगितले की, आरोपीने महिलेला प्रथम पश्चिम बंगाल येथील सिलीगुडी येथील डान्सबारमध्ये पाहिले होते.
Dehradun Army Officer Kills Woman: डेहराडून पोलिसांनी लष्करातील एका लेफ्टनंट कर्नलला (Army Lieutenant Colonel Arrested) अटक केली आहे. त्याच्यावर नेपाळी महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. पलिसांनी सांगितले की, आरोपीने महिलेला प्रथम पश्चिम बंगाल येथील सिलीगुडी येथील डान्सबारमध्ये पाहिले होते. त्यानंतर त्याने तिला उत्तराखंडच्या डोंगराळ भागात आणले होते. जिथे तिची कथीतरित्या हत्या करण्यात आली. सोमवारी सिरवाल गड परिसरात एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत हत्येची उकल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची नेपाळ येथील नागरिक आहे. सध्यास्थितीत ती सिलीगुडी येथे राहात होती.
आरोपी रामेंदू उपाध्याय हा क्लेमेंट टाउन कॅन्टोन्मेंट परिसरात तैनात होता. त्याने महिलेची कथितपणे हत्या केली. महिलेसोबत त्याचे विवाहबाह्य संबंध होते. दरम्यान, हे संबंध काहीसे अधिकच दृढ झाल्यावर तिने त्याच्याशी विवाह करण्यासाठी तगादा लावला होता. सततच्या तगाद्याला कंटाळून त्याने तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याला पंडितवारी प्रेमनगर येथील घरातून त्याला अटक करण्यात आली.
आरपीने पोलीस तपासात माहिती देताना सांगितलेकी, पीडितेचे नाव श्रेया शर्मा असेल आहे. ती आरोपी उपाध्याय याला सिलीगुडी येथील एका डान्सबारमध्ये भेटली होती. पाठिमागील अनेक वर्षांपासून दोघांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, आरोपीची बदली डेहराडूनला झाल्यावर तो तिला सोबत घेऊन आला. येथे त्याने तिला एक फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने शनिवारी रात्री महिलेसोबत मद्यपान केले. त्यानंतर दोघे लॉन्ग ड्राईव्हसाठी गेले. दरम्यान, ते थांगो रोडवर आले. जो शहरापासून काहीसा दूर आणि निर्मनुष्य असतो. साधारण मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ते या रस्त्यावर आले. त्याने कार रस्त्याच्या बाजूला उभा केली आणि महिलेवर हातोड्याने सलग प्रहार करण्यास सुरुवात केली. जोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याची त्याला खात्री पटली नाही तोपर्यंत तो तिच्यावर प्रहार करत होता. महिलेची हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकला आणि आपल्या वाहनासह तो तिथून निघून गेला. पोलिसांनी सांगितले की, लष्करात अधिकारी असलेला आरोपी उपाध्याय हा विवाहीत आहे. मात्र, विवाहासाठी सततचा तगादा लावल्याने त्याने हे कृत्यकेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.