Nepal Earthquakes: नेपाळच्या बांगलुंग जिल्ह्यात एकापाठोपाठ दोन भूकंप; भूकंपमापन यंत्रावर 4.7 आणि 5.3 तीव्रतेची नोंद

भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची 4.7 आणि 5.3 इतक्या तीव्रतेची नोंद झाली.

Earthquake | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नेपाळमधील बांगलुंग (Baglung District) जिल्ह्यात बुधवारी पहाटे एकापाठोपाठ एक असे दोन भूकंप (Nepal Earthquake) झाले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची 4.7 आणि 5.3 इतक्या तीव्रतेची नोंद झाली. नेपाळच्या भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्र (NEMRC) ने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही भूकंप बुधवारी (28 नोव्हेंबर) सकाळी झाले.

नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्र (ational Earthquake Monitoring & Research Center Nepal) ने दिलेल्या माहितीनुसार, बांगलुंग परिसरात स्थानिक वेळेनुसार पहाटे 01:23 वाजता 4.7 तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. NEMRC, नेपाळ यांनी केलेल्या ट्विटनुसार बागलुंग जिल्ह्यातील खुंगा येथे 02:07 वाजता (स्थानिक वेळेनुसार) रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला.

ट्विट

दरम्यान, भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. वित्तहानी झाल्याबाबत अद्याप तपशील जाहीर झाला नाही.



संबंधित बातम्या

Nepal Earthquakes: नेपाळच्या बांगलुंग जिल्ह्यात एकापाठोपाठ दोन भूकंप; भूकंपमापन यंत्रावर 4.7 आणि 5.3 तीव्रतेची नोंद

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Boeing Layoff: बोईंगमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदी सुरू; 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासंदर्भात पाठवली नोटीस

Swiggy Instamart's Best-Selling Product: स्विगी इंस्टामार्ट वर 10 मिनिटांत डिलेव्हरी मिळवण्यासाठी 'या' गोष्टीला सर्वाधिक मागणी!

Maharashtra Assembly Elections 2024: अमित शहांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; नागपूरहून अचानक दिल्लीला रवाना

Long-Range Hypersonic Missile: DRDO ने केली लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; काय आहेत त्याची वैशिष्ट्ये ? जाणून घ्या