Drugs Failed Quality Test in 2024: 2024 मध्ये गुणवत्तेच्या चाचणीत जवळपास 3,000 औषधे अयशस्वी; तर 282 औषधे आढळले बनावट
2023-2024 या वर्षातील सरकारी आकडेवारी सांगते की, गुणवत्ता चाचणीसाठी एकूण 1,06,150 औषधांच्या नमुन्यांपैकी 2,988 प्रमाणित दर्जाचे नसल्याचे आढळून आले. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, या चाचणीत 282 औषधे बनावट असल्याचे आढळून आले.
Drugs Failed Quality Test in 2024: आपण आजारी असताना जे औषधे घेतो, त्यातली काही औषध जर निकृष्ट दर्जाची असतील तर? होय, कारण सरकारने तपासलेल्या औषधांचे आकडे आपल्याला असा विचार करायला भाग पाडतात. 2023-2024 या वर्षातील सरकारी आकडेवारी सांगते की, गुणवत्ता चाचणीसाठी एकूण 1,06,150 औषधांच्या नमुन्यांपैकी 2,988 प्रमाणित दर्जाचे नसल्याचे आढळून आले. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, या चाचणीत 282 औषधे बनावट (Fake Drugs) असल्याचे आढळून आले.
बनावट आणि निकृष्ट औषधांविरोधात मोठी मोहीम -
बनावट औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरण प्रकरणी 604 प्रकरणांमध्ये खटला सुरू करण्यात आला आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या आकडेवारीनुसार, देशात सुमारे 10,500 युनिट्स विविध प्रकारचे डोस फॉर्म आणि API तयार करतात. सरकार बनावट आणि निकृष्ट औषधांविरोधात मोठी मोहीम राबवत आहे. सरकार विविध राज्यांतील औषध कंपन्यांवर छापे टाकत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत आहे. (हेही वाचा -India's 52 Drug Samples Fail Quality Test: भारतातील 52 औषधांचे नमुने गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; यादीत Paracetamol चाही समावेश)
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत 500 हून अधिक कॅम्पसमध्ये तपासणी करण्यात आली आहे. तसेच या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करणे, उत्पादन थांबवण्याचे आदेश, निलंबन, परवाना किंवा उत्पादन परवाना रद्द करणे यासारख्या कृती राज्य परवाना अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. बनावट आणि निकृष्ट औषधांवर कारवाई करण्यासाठी डीसीजीआयने हे पाऊल उचलले आहे. त्याचे पालन न करणाऱ्या कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Ayushman Bharat Scheme: आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता 70 वर्षांवरील वृद्धांनाही मिळणार मोफत उपचार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय)
तथापी, गेल्या सप्टेंबरमध्ये इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स (IPA) ने म्हटले होते की, बनावट उत्पादने कायदेशीर उत्पादकांशी जोडल्याने त्यांच्या स्थितीवर आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या अहवालादरम्यान हे विधान आले आहे. या अहवालात, 50 हून अधिक उत्पादने मानक गुणवत्ता (NSQ) नुसार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)