National Unity Day 2020: सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएम मोदी आणि अमित शहा यांच्यासह 'या' नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
National Unity Day 2020: देशभरात आज 'नॅशनल युनिटी डे' म्हणजेच 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा केला जाणार आहे. तर आज पोलादी पुरुष म्हणून ओळख असलेल्या सरदार वल्लभ भाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची 144 वी जयंती साजरी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि एलजी बिजल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे अग्रदूत असे लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र श्रद्धांजली.
तर भारत सरकारने 2014 मध्ये 31 ऑक्टोंबर म्हणजेच सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जन्मदिवसाला राष्ट्रीय एकता दिवस म्हणून घोषित केला. त्यामुळेच प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोंबरला मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा दिवस साजरा करण्यात येतो. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात येथील स्टॅच्यु ऑफ युनिटी येथे जाऊन त्यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. तसेच एकता परेड सुद्धा आजच्या दिवशी पार पडणार आहे.(National Unity Day 2020: पोलादी पुरुष म्हणून ओळख असणाऱ्या सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो 'राष्ट्रीय एकता दिवस', जाणून घ्या महत्व)
Tweet:
Tweet:
भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुद्धा सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त एक खास ट्विट केले आहे.
दरम्यान, सरदार वल्लभ भाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यांनी भारताला एकजुट करण्यासाठी महत्वाची भूमिका साकारली होती. खरंतर गृहमंत्र्यांच्या रुपात त्यांचे प्रथम काम हे देशातील रियारस या भारतात आणणे हे होते. या कामासाठी त्यांनी आपले रक्त सुद्धा मातृभुमिसाठी सांडले आहे. भारतातील एकीकरण मध्ये आपले योगदान दिल्याने त्यांना लोह पुरुषाची उपमा दिली गेली