National Emergency Over Rampant Drug Abuse: सिएरा लिओनमध्ये मानवी हाडांपासून बनवलेल्या Drug Kush च्या वापरात वाढ; अनेक लोकांचा मृत्यू, राष्ट्रपतींनी घोषित केली राष्ट्रीय आणीबाणी
शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांसोबतच या औषधाचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
पश्चिम आफ्रिकेतील देश सिएरा लिओनच्या (Sierra Leone) राष्ट्रपतींनी एका ड्रग्जमुळे राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency) घोषित केली आहे. या ड्रग्जचे नाव कुश (Kush) आहे जे व्यसनाधीन पदार्थांचे सायकोएक्टिव्ह मिश्रण आहे. या देशात अनेक वर्षांपासून हे ड्रग लोकांना व्यसनाधीन बनवत आहे. अध्यक्ष ज्युलियस माडा बायो (President Julius Maada Bio) यांनी या ड्रगचे वर्णन 'मृत्यूचा सापळा' असे केले आहे आणि म्हटले आहे की यामुळे 'अस्तित्वाचे संकट' निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे हे ड्रग बनवण्यासाठी वापरण्यात येणारे एक साहित्य म्हणजे मानवी हाडे आहेत.
यामुळे व्यसनाधीन लोक कबरी खोदताना दिसले आहेत. हे थांबवण्यासाठी स्मशानभूमींमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, सिएरा लिओनमध्ये रस्त्याच्या कडेला अनेक लोक बसलेले दिसत आहेत, ज्यांचे अवयव ड्रगच्या अतिसेवनामुळे सुजले आहेत. या ड्रगमुळे किती लोकांचा मृत्यू झाला आहे याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र बीबीसीच्या वृत्तानुसार, एका डॉक्टरने सांगितले की, राजधानी फ्रीटाऊनमध्ये गेल्या काही महिन्यांत या ड्रगचे सेवन केल्याने शेकडो तरुणांचा मृत्यू झाला आहे.
पहा व्हिडिओ-
अति प्रमाणात अंमली पदार्थ सेवन केल्यामुळे लोकांचे अवयव काम करणे बंद झाले होते त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांसोबतच या औषधाचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सिएरा लिओन मानसोपचार रुग्णालयाचे म्हणणे आहे की, 2020 ते 2023 दरम्यान ‘कुश’ या ड्रगमुळे दाखल रुग्णालयात झालेल्या लोकांची संख्या 4000 टक्क्यांनी वाढली आहे. (हेही वाचा: Mozambique Boat Sank: दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना, स्थलांतरित लोकांचे जहाज समुद्रात बुडालं)
अध्यक्ष बायो यांनी गुरुवारी रात्री एका भाषणात सांगितले की, या ड्रगमुळे आपला देश सध्या अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे. राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करताना राष्ट्रपती म्हणाले की, या ड्रगचा दुरुपयोग रोखण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्स तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या टास्क फोर्समध्ये प्रामुख्याने कुश संकटाचा सामना करण्यावर भर असेल. प्रत्येक जिल्ह्यात केंद्रे स्थापन केली जातील, ज्यामध्ये प्रशिक्षित व्यावसायिक व्यसनाधीन लोकांना मदत करतील. सध्या फ्रीटाऊन हे या देशातील एकमेव शहर आहे जिथे ड्रग रिहॅबिलिटेशन सेंटर कार्यरत आहे. ते या वर्षी लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात बांधले गेले.