आज तमिळनाडूमध्ये गाजा तूफान धडकण्याची शक्यता, शाळा- महाविद्यालये बंद
तमिळनाडूच्या किनाऱ्यावर चक्रवती गाजा तुफान येऊन धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तमिळनाडूच्या किनाऱ्यावर चक्रवती गाजा तुफान येऊन धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाजा हे तुफान चेन्नईपासून जवळजवळ 380 किमी दूर आहे. तर चेन्नईच्या दक्षिण पूर्व आणि नागापट्टिनप पासून 400 किमी दूर उत्तर पूर्वेमध्ये आले आहे.
तमिळनाडूमध्ये येणाऱ्या या आपत्तीमुळे प्रचंड पाऊस पडणार असल्याचे ही सांगितले जात आहे. मात्र तमिळनाडूमधील सर्व मच्छिमारांना लवकर समुद्रातून बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर शाळा- महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. या गाजा तुफानामुळे 110 किमी प्रति तास असे वारे वाहत आहेत. तर संध्याकाळपर्यंत वाऱ्याचा वेग वाढून तो 125 किमी प्रति तास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढच नसून नौसेना या तुफानाला दोन हात करण्यासाठी सज्ज झाली असून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सर्व गोष्टींची तयारी करण्यात आली आहे.
तर मच्छिमारांना 12 नोव्हेंबरपासूनच येणाऱ्या तुफानामुळे सतर्क राहण्यास सांगितले होते. तसेच आज तमिळनाडूच्या उत्तर दिशेला आणि आंध्र प्रदेशाच्या दक्षिणेकडील तट पार केल्यास हे तुफान कमी होण्याची शक्यता बाळगली जात आहे.