नागपूर: रेल्वेतून विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून 18.32 कोटी रुपयांची दंड वसूली

त्यानुसार गेल्या महिन्यांमध्ये एकूण 18.32 कोटी रुपयांची दंड वसूली झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Indian Railways (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वे प्रशासनाकडून नागपूर मंडळाअंतर्गत रेल्वेतून विनातिकिट प्रवास करणाऱ्यांच्या प्रवाशांबाबत एक विशेष अभियान चालवण्यात आले. त्यानुसार गेल्या महिन्यांमध्ये एकूण 18.32 कोटी रुपयांची दंड वसूली झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. या कालावधीत 4,09,512 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये विनातिकिट प्रवाशांसह अनियमित प्रवास आणि बुकिंग न करता लगेज घेऊन जाणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. मंडळ रेल्वे प्रवंधक एच.के. बेहरा यांच्याद्वारे चालविण्यात आले्या अभियिनात फक्त जानेवारी 2020 या महिन्यात 1.69 कोटींची दंड वसूली करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वेत महिलांच्या डब्यामधून प्रवास करणाऱ्या 402 पुरुषांवर वर्शभरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेल्वे कायद्याच्या तरतुदीनुसार महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात पुरुषांचा प्रवेश बंद होण्यासाठी मोहिम राबवली जाते. त्यानुसार गेल्या वर्षभरात 402 गुन्हा दाखल झाले असून रेल्वेच्या न्यायालयाने 63 हजार 150 रुपयांचा दंड आकारला होता.तसेच काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे रेल्वेस्थानकावरुन धावणाऱ्या मेल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 529 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 2 लाख रुपयांची दंडवसुली रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.(1 जानेवारी पासून RuPay कार्ड आणि UPI च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पेमेंटसाठी MDR शुल्क माफ)

त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने तिकिट घेऊन प्रवास करवा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तसेच येत्या काही दिवसातात सातत्याने तिकिट तपासणी मोहिम राबवण्यात येणार असल्याचे ही प्रशासनाने प्रवाशांना सांगितले आहे.