ओडिशा: मुंबई- भुवनेश्वर लोकमान्य तिलक एक्सप्रेस रूळावरून घसरली; 20 प्रवासी जखमी

मुंबई - भुवनेश्वर लोकमान्य तिलक टर्मिनन्स एक्सप्रेस (Lokmanya Tilak Express) चे 8 डबे घसरले आहेत, दरम्यान आज (16 जानेवारी) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कटक येथील नेरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ येथे हा अपघात घडला आहे

Lokmanya Tilak Express Derails (Photo Credits: ANI)

Mumbai-Bhubaneswar Lokmanya Tilak Express Accident:  मुंबई - भुवनेश्वर लोकमान्य तिलक टर्मिनन्स एक्सप्रेस (Lokmanya Tilak Express) चे 8 डबे घसरले आहेत, दरम्यान आज (16 जानेवारी) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कटक येथील नेरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ येथे हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये सुमारे 20 जण जखमी असून 5 जणांची स्थिती गंभीर आहे. सध्या प्रशासनाकडून अपघातग्रस्तांना मदत पोहचवण्याचं कार्य सुरू आहे.

ANI Tweet

मुंबई- भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्सप्रेसचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे नेमके ठाऊक नाही मात्र सध्या उत्तर भारतामध्ये थंडी असल्याने धुकं प्रचंड प्रमाणात आहे. यामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या धुक्यामुळे उत्तर भारतामध्ये अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींच्या वेळापत्रकात बदल झाले आहेत.

Mumbai-Bhubaneswar Lokmanya Tilak Express रूळावरून घसरली; 5 जणांची स्थिती गंभीर Watch Video