मुंबईत नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन, 84 जणांच्या विरोधात कारवाई तर 28 जणांना अटक

त्यामुळे वारंवार नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर राज्य सरकारने आता मिनी लॉकडाऊन सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: AFP)

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वारंवार नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर राज्य सरकारने आता मिनी लॉकडाऊन सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. अशातच गेल्या 24 तासात मुंबईत नागरिकांकडून करण्यात आलेल्या नियमांच्या उल्लंघनाच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी 84 जणांच्या विरोधात कारवाई केली गेली असून 28 जणांना अटक करण्यात आली आहे.(Maharashtra COVID-19 Restrictions: महाराष्ट्रामध्ये Weekend Lockdown ची घोषणा; रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत लागू असेल नाईट कर्फ्यू)

पोलिसांकडून 19 जणांचा विरोधात FIR दाखल केला गेला आहे. त्यामध्ये नऊ जण हे हॉटेलचे कर्मचारी, दुकानांमधील असून त्यांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. ऐवढेच नाही तर 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास सांगितले असले तरीही ती मर्यादित वेळेनंतर सुरु ठेवली जात होती. तर अन्य पाच जणांनी मास्क न घातल्याने आणि उर्वरित जणांनी सार्वजनिक ठिकाणी संचारबंदीच्या वेळी गर्दी केल्याने कारवाईसह क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.(Dahisar Jumbo Covid Centre: दहिसर जंबो कोविड सेंटरमध्ये लागलेली आग नियंत्रणात; कोणतीही जीवितहानी न झाल्याची मुंबई महानगरपालिकेची माहिती)

एकूण 42 जणांना नोटीस पाठवण्यात आली असून त्यामधील 14 जण फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर गेल्या वर्षात मार्च महिन्यात देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली गेली. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये तुफान वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अशातच आतापर्यंतच एकूण 59,205 जणांच्या विरोधात कारवाई, 26,927 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचसोबत 23,138 जणांना नोटीसा धाडण्यात आली आहे.