HC on RG Kar Medical College Vandalism: 'रुग्णांना हलवा आणि रुग्णालय बंद करा', आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या तोडफोडीच्या घटनेवरून कोलकाता उच्च न्यायालयाने ममता सरकारवर ताशेरे

'हे सरकारचे अपयश असून वैद्यकीय महाविद्यालय बंद करावे,' असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Calcutta High Court | Photo Credits: Wikimedia Commons

HC On RG Kar Medical College Vandalism: सध्या देशभरात आरजी कार मेडिकल कॉलेज (RG Kar Medical College) चे प्रकरणाची चर्चा सुरू आहे. महिला डॉक्टरवर झालेल्या क्रूरतेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुरुवारी जमावाकडून मेडिकल कॉलेजमध्येही तोडफोड करण्यात आली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) या प्रकरणी हस्तक्षेप करत कडक टीका केली आहे. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नुकत्याच झालेल्या तोडफोडीच्या घटनेवर कोलकाता उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 'हे सरकारचे अपयश असून वैद्यकीय महाविद्यालय बंद करावे,' असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय, न्यायालयाने डॉक्टरांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण उपलब्ध करून देण्याच्या बंगाल सरकारच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा घटनांमुळे आरोग्य व्यावसायिकांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होते, अशी टिपण्णीही उच्च न्यायालयाने केली आहे.

सुनावणीदरम्यान, न्यायालयाने रुग्णालयावरील हल्ला रोखण्यात 'राज्य यंत्रणेच्या पूर्ण अपयशाकडे' लक्ष वेधले. या घटनेत रुग्णालयातील महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे नष्ट झाली. प्रचंड तोडफोड झाली. अशा घटनांचा डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर आणि आत्मविश्वासावर गंभीर परिणाम होतो. या घटनेने डॉक्टरांचे मनोधैर्य खचते आणि त्यांचा आत्मविश्वास खचतो, असेही उच्च न्यायालयाने यावेळी नमूद केले. (हेही वाचा -Kolkata Rape-Murder Case: निदर्शनादरम्यान RG Kar Medical College मध्ये हिंसाचार; जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड)

दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने आरोग्य व्यावसायिक हिंसाचार किंवा धमकीला न घाबरता त्यांची कर्तव्ये पार पाडू शकतील असे वातावरण निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असंही म्हटलं आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन न्यायालयाने केले आहे. (हेही वाचा -Rape & Murder of Doctor at Kolkata Hospital: कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होईपर्यंत BMC MARD कडूनही 13 ऑगस्ट पासून Non-Emergency Medical Services बंद ठेवण्याचा निर्णय)

यावेळी राज्य सरकारने आपली भूमिका मांडली आणि घटना घडली त्यावेळी पोलिस तेथे उपस्थित होते असे सांगितले. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, ते आपल्या लोकांचे संरक्षण करू शकत नाहीत? ही दुर्दैवी परिस्थिती आहे. हे डॉक्टर निर्भयपणे कसे काम करतील? आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील तोडफोड आणि हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 19 जणांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या लोकांना शहर न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.