मोटार, आरोग्य विम्याच्या मुदतीमध्ये 15 मे पर्यंत वाढ; Coronavirus Lockdown च्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा निर्णय

दरम्यान ही बाब लक्षात घेता आता अर्थ मंत्रालयाकडून मोटार आणि आरोग्य विम्याला 15 मे 2020 पर्यंत ग्राह्य धरण्याची अनुमती दिली आहे.

Insurance | Image Used for Representative Purpose Only | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन 15 एप्रिलपासून पुढे 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान ही बाब लक्षात घेता आता अर्थ मंत्रालयाकडून मोटार आणि आरोग्य विम्याला 15 मे 2020 पर्यंत ग्राह्य धरण्याची अनुमती दिली आहे. यापूर्वी अर्थमंत्रलयाने ही 21 एप्रिल पर्यंत वाढवली होती. मात्र आता पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने विमा धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोटार कंपन्यांचा वाढवलेला विमा हा केवळ थर्ड पार्टी मोटार आहे. अपघात किंवा owned-damage ही विम्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. Coronavirus: देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा.

दरम्यान 25 मार्च ते 3 मे 2020 मध्ये ज्या विमा धारकांची मुदत संपणार आहे. अशांना ही मुदतवाढ ग्राह्य असेल. अशी माहिती TOI,च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. सोबतच IRDAI च्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, विम्यासाठी देण्यात आलेली ही मुदतवाढ केवळ motor-third party component साठी लागू राहणार आहे. विम्याची मुदर संपली असली तरीही यापूर्वी देण्यात आलेल्या अटी आणि सूचनांनुसार जुन्या पॉलिसीमधूनच आरोग्य किंवा मोटारमध्ये नो क्लेम बोनस देण्यात येणार आहे.

दरम्यान भारतामध्ये 24 मार्च दिवशी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काळ 21 दिवसांचा होता. परंतू देशातील वाढती कोरोनाबाधित रूग्णसंख्या पाहता आता लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला आहे.