Most Popular Global Leader: पंतप्रधान Narendra Modi ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते; मिळाले 76% अप्रूव्हल रेटिंग
यादीनुसार पीएम मोदींचे नापसंत रेटिंग केवळ 18 टक्के आहे, तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे नापसंती रेटिंग 58 टक्के आहे. पॉलिटिकल इंटेलिजन्स रिसर्च फर्मने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
भारताने नुकतेच यशस्वीपणे जी-20 परिषदेचे आयोजन केले, यामध्ये जगभरातील अनेक मोठे नेते सहभागी झाले. जी-20 नंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसून येत आहे. पीएम मोदींनी पुन्हा एकदा ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
अमेरिकन सल्लागार कंपनी 'मॉर्निंग कन्सल्ट'ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 76 टक्के रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते मानले गेले आहे. सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातव्या तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक 15 व्या क्रमांकावर आहेत.
या यादीमध्ये पीएम मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट आणि तिसऱ्या स्थानावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला चौथ्या क्रमांकावर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बिओनीज पाचव्या स्थानावर, तर इटलीचे पंतप्रधान मेलोनी जॉर्जिया सहाव्या स्थानावर आहेत. लोकप्रियतेच्या या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची मान्यता रेटिंग 40 टक्के आहे. मार्च महिन्यानंतरचे हे त्यांचे सर्वात मोठे अप्रूव्हल रेटिंग आहे. बिडेन यांची लोकप्रियता घसरली होती. (हेही वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्यांसाठी महत्त्वाची बातमी! महागाई भत्त्याच्या थकबाकीलाही मिळणार मंजुरी, कधी येणार पैसे? जाणून घ्या)
हा डेटा 6 ते 12 सप्टेंबर दरम्यान गोळा करण्यात आला. यादीनुसार पीएम मोदींचे नापसंत रेटिंग केवळ 18 टक्के आहे, तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे नापसंती रेटिंग 58 टक्के आहे. पॉलिटिकल इंटेलिजन्स रिसर्च फर्मने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 22 जागतिक नेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या यादीत सर्वात कमी लोकप्रिय आहेत दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सेओक्योल आणि झेक प्रजासत्ताकचे अध्यक्ष पेटर पावेल आहेत.