Money Laundering Case: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Cox and Kings चे प्रमोटर पीटर केरकर यांना ED कडून अटक
Money Laundering Case: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कर्जात अकडलेली ग्लोबल ट्रॅव्हल्स कंपनी कॉक्स अॅन्ड किंग्सचे (Cox and Kings) प्रमोटर पीटर केरकर (Peter Kerkar) यांना ईडी (ED) कडून अटक करण्यात आली आहे. ईडी यांच्या मते, कॉक्स अॅन्ड किंग्स आणि त्यांच्या अन्य कंपन्यांवर 3642 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये कॉक्स अॅन्ड किंग्स कंपनीचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये 20 हजार कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा करण्यात आला असून त्यात भारतातील काही बँकांचा समावेश आहे. ज्यांनी कंपनीला कर्ज दिले असून त्यांना ते परत मिळालेले नाही.
ED नुसार, कॉक्स अॅन्ड किंग्सवर 563 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या संबंधित कंपन्या ईजीगो वन ट्रॅव्हल अॅन्ड टुअर्स वर 1012 कोटी, कॉक्स अॅन्ड किंग्स फायनेंशिअल सर्विसेस लिमिटेड 422 कोटी रुपये, प्रोमेथियोन एंटरप्रायझेस लि, युकेवर 1152 कोटी रुपये आणि मालवेर्न ट्रॅव्हल लि, युके वर 493 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एकूण कर्जाची रक्कम 3641 कोटी रुपये आहे. येस बँकेकडून 3642 कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी कथित अनियमिततांबद्दल कळले असता ट्र्रॅव्हल कंपनी ED च्या कचाट्यात सापडली.(Yes Bank Money Laundering Case: येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कडून कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांना अटक)
एजन्सीचा असा संशय आहे की, कर्जाची रक्कम भारताबाहेरील सहाय्यक कंपन्यांमार्फत परदेशात पाठविली गेली होती. ईडीच्या मते या कंपनीकडे एक्सिस बँकचे 1030 कोटी रुपये, इंडसइंड बँकेचे 239 कोटी आणि कोटक महिंद्रा बँकेचे 174 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र सध्याचे हे प्रकरण येस बँक आणि कॉक्स अॅन्ड किंग कडून घेण्यात आलेल्या 3641 कोटी रुपयांच्या कर्जासंबंधित आहे. जे पैसे कधीच परत करण्यात आलेले नाहीत.
याआधी गेल्याच महिन्यात ईडीने कंपनीच्या दोन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली होती. PMLA कायद्याअंतर्गत कॉक्स अॅन्ड किंग्सचे अंतर्गत लेखा परीक्षक अनिल खंडेलवाल आणि नरेश जैन यांना अटक केली होती.(Yes Bank मनी लॉन्डींग प्रकरणी ED कडून Cox & Kings कंपनीच्या मुंबई येथील 5 कार्यालयांवर छापा)
तर 1758 मध्ये स्थापन करण्यात आलेली कॉक्स अॅन्ड किंग्स ही कंपनी भारतातील मुख्य ट्रॅव्हल कंपन्यांपैकी एक होती. यामध्ये 3 हजारांहून अधिक कर्मचारी होते. ED एका कथित रुपातील घोटाळ्याप्रकरणी येस बँक आणि अन्य काही बड्या कॉर्पोरेट समुहांची चौकशी करत आहे. ज्यांनी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. नुकत्याच एका विशेष पीएमएल कोर्टाच्या समोर त्यांच्या विरोधात एक आरोप पत्र दाखल करण्यात आले होते.