भविष्यात आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता, मोहनदास पै यांचा अंदाज
इन्फोसीसचे माजी फायनान्शियल ऑफिसर मोहनदास पै यांनी असे म्हटले की, अर्थव्यवस्थेत सुरु असलेली मंदी कायम राहिल्यास यावर्षात 30-40 हजार लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
राज्यात सुरु असलेल्या आर्थिक मंदीमुळे येत्या भविष्यात सुद्धा आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इन्फोसीसचे माजी फायनान्शियल ऑफिसर मोहनदास पै यांनी असे म्हटले की, अर्थव्यवस्थेत सुरु असलेली मंदी कायम राहिल्यास यावर्षात 30-40 हजार लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. त्याचसोबत आयटी कंपनीत प्रत्येक पाच वर्षानंतर हजारो लोकांच्या नोकऱ्या याच पद्धतीने जाता. कारण पाच वर्षात आयटी इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल झाल्याने त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर होतो.
पै यांनी आयटी कंपनीबाबत असे म्हटले की, जेव्हा एखादी कंपनी प्रगती करण्यास सुरुवात करते त्यावेळी मध्यम स्तरावरील लोकांना त्यांच्या वेतनानुसार कंपनीमध्ये वॅल्यू अॅड करु शकत नाही. याच कारणामुळे सेक्टरमध्ये प्रत्येक देशात जेव्हा एखादी इंडस्ट्री प्रगत करते त्यावेळी बहुतांश लोकांना याच कारणामुळे नोकरीवर पाणी सोडावे लागते. तसेच एखादी कंपनी विकासाच्या मार्गावर असते त्यावेळी कर्मचाऱ्यांना प्रमोशन आणि वेतनात वाढ होते. याच परिस्थितीत कंपनीला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. मात्र जेव्हा कंपनीचा विकास थांबतो त्यावेळी मेनेजमेंटला पुन्हा एकदा विकासासाठी जोमाने काम करावे लागते.(HDFC बँकेकडून FD वरील व्याजदरात कपात, जाणून घ्या नवे दर)
तसेच आयटी इंटस्ट्रीमध्ये दर पाच वर्षांनी होणाऱ्या बदलामुळेच कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येते. मात्र एखाद्याला मोठ्या प्रमाणात वेतन दिले जाते त्यानुसार त्यांना कंपनीसाठी योगदान द्यावे लागते. मात्र यामध्ये यशस्वी न झालेल्या कर्मचाऱ्यांचे फार नुकसान होते. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे त्यांच्याकडे दुसरी संधी सुद्धा असणार आहे. परंतु त्यांना बदलत्या काळानुसार अपडेट रहावे लागणार आहे.