PF साठी सरकारकडून नागरिकांना दिलासा, आता 5 लाखापर्यंतच्या गुंतवणूकीवर कर माफ
कारण सरकारने प्रोविडेंट फंडमध्ये टॅक्स फ्री गुंतवणूकीची सीमा एका खास कॅटेगरीतील लोकांसाठी वाढवून 5 लाख रुपये केली आहे.
प्रोविडेंट फंड (PF) संदर्भात सरकारकडून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कारण सरकारने प्रोविडेंट फंडमध्ये टॅक्स फ्री गुंतवणूकीची सीमा एका खास कॅटेगरीतील लोकांसाठी वाढवून 5 लाख रुपये केली आहे. म्हणजेच आता 5 लाखापर्यंत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना कर माफ असणार आहे. त्याचसोबत ज्यांच्या पीएफ खात्यामध्ये मालकाकडून कोणतेही योगदान दिले जात नाही त्यांना याचा लाभ होणार आहे.(7th Pay Commission: होळीनिमित्त मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट; सातवे वेतन आयोगाच्या अंतर्गत मिळणार 10 हजार रुपये एडवांस)
तर 5 लाखापर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांना कर माफ असणार आहे. लोकसभेत पारित करण्यात आलेल्या आर्थिक विधेयक 2021 मध्ये ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी असे म्हटले की, यामुळे प्रोविडेंट फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या 1 टक्के लोकांवर याचा परिणाम होणार आहे. कारण अन्य जणांच्या पीएफमध्ये वर्षाला योगदान 2.5 लाख रुपयांहून कमी आहे.याचा फायदा अशा लोकांना मिळणार आहे जे वॉलिंटियरी प्रोविडेंट फंड म्हणजेच वीवीएफ आणि पब्लिक प्रोविंडेंट फंड म्हणजेच पीपीएफ मध्ये गुंतवणूक करतात. अशा प्रकारे एकूण 5 लाख रुपयापर्यंत पीएफमधील गुंतवणूकीवर मिळणाऱ्या व्याजावर कर माफची सुविधा मिळू शकते.(Pan Aadhaar Linking: 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करा, अन्यथा भरावा लागू शकतो 10,000 रुपयांचा दंड)
आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा नवा नियम जाहीर केला होता. त्यात असे होते की. 1 एप्रिल पासून वर्षाला 2.5 लाख रुपयांहून अधिक प्रोविडेंट फंड जमा करणाऱ्यांना मिळणाऱ्या व्याज टॅक्समध्ये मोडतात. खरं म्हणजे अशा प्रकारची सूट असल्यामुळे बहुतांश लोक पीएफ हा टॅक्स वाचवण्याच्या दृष्टीचे वापर करतात आणि वीवीएफसह पीपीएफ मध्ये गुंवतणूक करुन टॅक्सपासून वाचतात. यामध्ये हाय इनकम असणाऱ्या लोकांना प्रभावित करतात. परंतु अर्थमंत्र्यांनी ही सीमा 5 लाख रुपये करुन त्यांना दिलासा दिला आहे.