देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ंणांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा होळीचा सण (Holi 2021) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी होळीचा सण 29 मार्च म्हणजेच महिना अखेरिस आला आहे. यापर्यंत सहजिकच सर्वांचा पगार समाप्त झालेला असतो. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. मोदी सरकार स्पेशल फेस्टीवल एडवांस स्कीमचा (Special Festival Advance Scheme) लाभ देत आहे.
यापूर्वी सहावे वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना 4 हजार 500 रुपये मिळायचे. परंतु, केंद्र सरकारने यात वाढ केली असून आता यापुढे कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, केंद्र सरकार होळीसारखे सण साजरे करण्यासाठी कर्मचाऱ्यांना एडवांसमध्ये 10 हजार रुपये देण्याची शक्यता आहे. या स्कीमचा लाभ येत्या 31 मार्चपर्यंत घेता येणार आहे. हे पैसे कर्मचारी 10 आठवड्यात परत करू शकतात. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना 1 हजार रुपये मासिक हप्त्याद्वारे परतफेड करता येणार आहे. हे देखील वाचा- Pan Aadhaar Linking: 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करा, अन्यथा भरावा लागू शकतो 10,000 रुपयांचा दंड
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच म्हटले होते की, उत्सवांसाठी दिलेली ही आगाऊ रक्कम पूर्वीपेक्षा जास्त असेल. हे पैसे आधीच केंद्रीय कर्मचार्यांच्या एटीएममध्ये नोंदणीकृत असतील, फक्त कर्मचाऱ्यांना खर्च करावे लागणार आहे. कोरोना कालावधीत केंद्र सरकारने ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांचा डीए फ्रीझ केला होता. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला होता. अशा परिस्थितीत ही आगाऊ रक्कम कर्मचार्यांना मोठा दिलासा देणारी ठरण्याची शक्यता आहे.