Ministry of Co-operation: केंद्र सरकारकडून नवीन 'सहकार मंत्रालयाची' स्थापना

देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी हे मंत्रालय एक प्रशासकीय, वैधानिक आणि धोरणात्मक चौकट नव्याने निर्माण करू शकेल.यामुळे सहकारी संस्थांंची मुळे घट्ट रुजून सहकार चळवळीला खऱ्या अर्थाने जनाधार मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

'सहकारातून समृद्धी' (‘Sahkar se Samriddhi) हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रणीत केंद्र सरकारने पूर्णपणे वेगळ्या 'सहकार मंत्रालयाची' ( Ministry of Co-operation) स्थापना करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. देशातील सहकार चळवळ (Cooperative Movement) बळकट करण्यासाठी हे मंत्रालय एक प्रशासकीय, वैधानिक आणि धोरणात्मक चौकट नव्याने निर्माण करू शकेल.यामुळे सहकारी संस्थांंची मुळे घट्ट रुजून सहकार चळवळीला खऱ्या अर्थाने जनाधार मिळू शकेल.

सहकाराच्या संकल्पनेत प्रत्येक सदस्य उत्तरदायित्वाच्या भावनेने प्रेरित होऊन काम करत असल्याने, आपल्या देशात सहकारावर आधारित असे आर्थिक विकासाचे प्रतिमान अतिशय सुयोग्य आहे. Modi Cabinet Reshuffle: केंद्राच्या कॅबिनेट विस्ताराच्या पार्श्वभूमीवर Jyotiraditya Scindia, Narayan Rane सह भाजप नेते दिल्लीत दाखल; पहा काय आहेत शक्यता.

सहकारी संस्थांसाठी 'व्यवसाय सुलभीकरण' प्रक्रिया सुरळीत करण्याचे आणि बहुराज्यीय सहकारी संस्थांंच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम, सहकार मंत्रालयाद्वारे होऊ शकेल.

समुदायाधारित विकासात्मक भागीदारीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे सरकारने सूचित केले आहे. वेगळे सहकार मंत्रालय स्थापन केल्याने, वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेचीही परिपूर्ती होत आहे. दरम्यान आज मोदी सरकारचा कॅबिनेट विस्तार देखील होणार आहे. मोदी सरकारमध्ये आता कोणती खांदेपालट होते? कोणत्या नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार? हे पहाणंदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता मोदी सरकारचा कॅबिनेट विस्तार होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now