Krishnamurthy Subramanian: मोदी सरकारचा मोठा निर्णय! IMF बोर्डाचे नामांकित सदस्य कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सुब्रमण्यम यांच्या सेवा 30 एप्रिल 2025 पासून संपुष्टात आणल्या आहेत. सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्याची कारणे अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत. सरकार लवकरच त्यांच्या जागी आयएमएफ बोर्डवर एका व्यक्तीची नियुक्ती करेल.

Krishnamurthy Subramanian (फोटो सौजन्य - ANI)

IMF Board Member Krishnamurthy Subramanian: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे कार्यकारी संचालक केव्ही सुब्रमण्यम (Krishnamurthy Subramanian) यांना त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने आधी सरकारने त्यांच्या सेवेतून मुक्त केले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सुब्रमण्यम यांच्या सेवा 30 एप्रिल 2025 पासून संपुष्टात आणल्या आहेत. सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्याची कारणे अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत. सरकार लवकरच त्यांच्या जागी आयएमएफ बोर्डवर एका व्यक्तीची नियुक्ती करेल.

दरम्यान, 2 मे पर्यंत आयएमएफच्या वेबसाइटवर कार्यकारी संचालक म्हणून सुब्रमण्यम यांचे नाव होते, परंतु 3 मे पासून हे पद रिक्त दाखवण्यात आले आहे. सुब्रमण्यम यांची ऑगस्ट 2022 मध्ये आयएमएफ बोर्डावर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते भारत सरकारचे 17 वे मुख्य आर्थिक सल्लागार होते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एसीसी समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.  (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील संशयित कोलंबोला पोहोचले? चेन्नईहून आलेल्या विमानाची श्रीलंका विमानतळावर तपासणी)

IMF बोर्डाचे नामांकित सदस्य कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात - 

कृष्णमूर्तींना का काढून टाकण्यात आले?

सुब्रमण्यम यांना काढून टाकण्यामागील कारण अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, 9 मे रोजी आयएमएफ नाणेनिधीची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याची बातमी आहे. भारताने पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या कर्जावर आक्षेप घेतला आहे आणि त्यावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. यावर भारताचा युक्तिवाद असा आहे की पाकिस्तानमध्ये विकासासाठी दिले जाणारे पैसे दहशतवाद्यांना दिले जाऊ शकतात. दरम्यान, आयएमएफने भारताची विनंती नाकारली आहे. (वाचा - Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुचं! नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर)

प्राप्त माहितीनुसार, कृष्णमूर्ती यांनी आयएमएफच्या डेटासेट संकलन प्रक्रियेवर आणि रेटिंग सिस्टमवर प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर संघटनेत त्याच्याबाबत मतभेद वाढले. आयएमएफसमोर भारताच्या भूमिकेवर सरकार नाराज असल्याचेही समोर आले आहे. अशा परिस्थितीत सरकारने सुब्रमण्यम यांना तात्काळ प्रभावाने पदावरून काढून टाकले आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव -

दरम्यान, सरकारने अद्याप या पदासाठी कोणाचेही नाव अंतिम केलेले नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. 22एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement