Haryanvi Model Sheetal Murder: हरियाणवी मॉडेल शीतलची हत्या; कालव्याजवळ आढळला गळा चिरलेला मृतदेह

सोनीपतचे एसीपी मुख्यालय अजित सिंह यांनी सांगितले की, शीतल 14 जूनपासून बेपत्ता होती. तिची बहीण नेहा हिने पानिपतमधील उरलाना कलान पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

Haryanvi Model Sheetal (फोटो सौजन्य - X/@Rrajora07)

Haryanvi Model Sheetal Murder: हरियाणवी संगीत क्षेत्रातील मॉडेल शीतल (Haryanvi Model Sheetal) उर्फ ​​सिम्मी चौधरी हिची हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील खारखोडा शहरात हत्या (Murder) करण्यात आली आहे. अज्ञात गुन्हेगारांनी शीतलचा गळा चिरून हत्या केली. काल संध्याकाळी खांडा गावाजवळील रिलायन्स कालव्यातून शीतलचा मृतदेह आढळला. तिच्या हातावर आणि मानेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा आढळल्या आहेत.

सोमवारी सकाळी तिच्या हातावर आणि छातीवर टॅटूवरून मॉडेल शीतलच्या मृतदेहाची ओळख पटली. मृत शीतल ही पानिपतची रहिवासी होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. खारखोडा पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रेम सिंग हत्येचा तपास करत आहेत. प्रेमप्रकरणातून शीतलच्या हत्येचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Raja Raghuvanshi Last Video: राजा रघुवंशी यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल; ट्रेकिंग करताना कॅमेऱ्यात कैद, पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसली खुनी सोनम)

दरम्यान, सोनीपतचे एसीपी मुख्यालय अजित सिंह यांनी सांगितले की, शीतल 14 जूनपासून बेपत्ता होती. तिची बहीण नेहा हिने पानिपतमधील उरलाना कलान पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. नेहाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले होते की, शीतल 14 जून रोजी घरातून बाहेर पडली होती. ती अहर गावात शूटिंगसाठी गेली होती. पण ती परत आली नाही तेव्हा तिने पोलिसांकडे तक्रार केली. शीतलच्या शोध मोहिमेदरम्यान सोनीपत पोलिसांना कालव्यात कार बुडल्याची बातमी मिळाली.

कारमधील तरुणांना लोकांनी वाचवले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कार कालव्यातून बाहेर काढली. शीतलच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, कालव्यात बुडण्यापासून वाचलेला तरुण सुनील हा शीतलचा प्रियकर आहे. अशा परिस्थितीत, सुनीलने शीतलची हत्या केली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अपघात भासवण्यासाठी कार कालव्यात टाकण्यात आली असावी. आता पोलीस या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. कारण पोलिसांना शीतलच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. पोलिस आता शीतलच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement