Raja Raghuvanshi Last Video: राजा रघुवंशी यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल; ट्रेकिंग करताना कॅमेऱ्यात कैद, पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसली खुनी सोनम

शिलाँगला भेट देण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या वापरकर्त्याने दावा केला आहे की, डबल डेकर ब्रिजच्या प्रवासादरम्यान तो हा व्हिडिओ बनवत असताना, राजा आणि सोनम रघुवंशी देखील त्याच्या फ्रेममध्ये दिसत होते.

Raja Raghuvanshi Last Video: राजा रघुवंशी यांचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल; ट्रेकिंग करताना कॅमेऱ्यात कैद, पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसली खुनी सोनम
Raja Raghuvanshi Last Video (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Raja Raghuvanshi Last Video: देशातील सर्वात खळबळजनक हत्याकांडाशी संबंधित आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) यांच्या मृत्यूपूर्वीचा हा शेवटचा व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे. शिलाँगला भेट देण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या वापरकर्त्याने दावा केला आहे की, डबल डेकर ब्रिजच्या प्रवासादरम्यान तो हा व्हिडिओ बनवत असताना, राजा आणि सोनम रघुवंशी देखील त्याच्या फ्रेममध्ये दिसत होते.

या व्हिडिओमध्ये राजा आणि सोनम वर चढताना दिलत आहेत. सोनमने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे, जो पहिल्यांदा सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. त्यानंतर 2 जून रोजी राजा रघुवंशी यांच्या मृतदेहाजवळ आढळला होता. प्राप्त माहितीनुसार, देवेंद्र सिंह नावाच्या एका तरुणाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला. त्याने म्हटलं आहे की, 'मी 23 मे 2025 रोजी मेघालय डबल डेकर रूट ब्रिजच्या सहलीला गेलो होतो. त्यावेळी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. काल मी व्हिडिओ पाहत होतो आणि मला इंदूरमधील त्या जोडप्याचे रेकॉर्डिंग सापडले. सकाळी 9:45 वाजले होते, जेव्हा आम्ही खाली जात होतो आणि राजा-सोनम नोग्रिट गावात रात्र घालवून वर चढत होते. मला वाटते की हे या दोघांचे शेवटचे रेकॉर्डिंग होते. मला आशा आहे की यामुळे मेघालय पोलिसांना केस सोडवण्यास मदत होईल.' (हेही वाचा - Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपींना मिळाला 7 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड; Transit Remand म्हणजे काय? जाणून घ्या)

राजा रघुवंशीचा शेवटचा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dev (@m_devsingh)

दरम्यान, या तरुणाने पुढे म्हटलं आहे की, 'मी जेव्हा जेव्हा व्हिडिओमध्ये राजाला पाहिले तेव्हा मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटले. तो सामान्य दिसत होता पण त्याला माहित नव्हते की, त्याच्या वाट्याला काय येईल. माझ्याकडे आणखी एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये इंदूरमधील आणखी 3 लोक देखील दिसत आहेत, ज्यांनी या दोघांच्या 20 मिनिटे आधी प्रवास सुरू केला होता. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.'

राजा रघुवंशी हत्याकांड -

इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेले. येथे सोनमने राजाची हत्या केली. राजा रघुवंशी यांची 23 मे रोजी वेसाडोंग फॉल्सजवळ हत्या करण्यात आली. त्यानंतर 2 जून रोजी त्यांचा मृतदेह एका खड्ड्यात आढळला. पोलिसांनी पुष्टी केली आहे की, राजाची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली. या हत्याकांडात सोनम मुख्य आरोपी असून तिने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली.

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2025 01:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).