#MeToo: 'माझी संमती नव्हतीच, एम. जे. अकबर यांनीच बलात्कार केला'; महिला पत्रकार आरोपावर ठाम

जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या फैरी काही कमी होताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस त्यात भरच पडताना दिसत आहे. त्यामुळे अकबर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

एम. जे. अकबर, माजी केंद्रीय मंत्री (Photo Credits: PTI)

अकबर यांच्यासोबतच्या संबंधांना माझी कोणतीही मान्यता नव्हती. त्यांनीच माझ्यावर बलात्कार केला असे, सांगत अमेरिकास्थित महिला पत्रकार आपल्या आरोपांवर ठाम आहे. माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत आपल्यावर बलात्कार केल्याचा दावा या महिला पत्रकाराने केला होता. त्यावर हा बलात्कार नव्हता. तर, परस्परसंमतीने ठेवलेले शरीरसंबंध होते. जे काहीच महिने टिकले, असा दावा अकबर यांनी केला होता.

अकबर यांच्यावर आरोप करणारी महिला पत्रकार अमेरिकेतील एका नामवंत प्रसारमाध्यम समूहात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. 'एशियन एज' या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केला होता. हा बलात्कार त्यांनी जयपूर येथील हॉटेलच्या एका खोलीत केला, असा आरोप या महिला पत्रकाराने केला होता. त्यावर ‘1994च्या काळी आमच्यात संबंध होते, परस्परसंमतीने आम्ही एकत्र होतो. मात्र नंतर हे नाते संपले’, असे स्पष्टीकरण अकबर यांनी दिले. मात्र,  हा वाद इथेच थांबला नाही. आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराने पुन्हा एकदा ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये या पत्रकाराने आपण आपल्या आरोपांवर ठाम आहोत. अकबर हे खोटे बोलत आहेत. ज्या महिलांना अकबर यांच्या अशा वागण्याचा अनुभव आला आहे, त्यांनी पुढे यावे असे अवाहनही या महिला पत्रकाराने केले आहे. (हेही वाचा, #MeToo : छे...छे.. तो बलात्कार नव्हे, ते तर परस्परसंमतीचे संबंध - एम. जे. अकबर यांचा दावा)

महिला पत्रकारने ट्विटमध्ये काय म्हटले आहे ?