मंगळरु येथे जीप चालकाने रस्त्यावरील महिलेला आणि मुलाला धडक देत गाडी खाली चिरडले, पण सुदैवाने वाचले (Video)
रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या 25 वर्षीय महिलेसह तिच्या मुलाला पाठून येणाऱ्या जीप चालकाने धडक दिल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मधून उघडकीस आला आहे.
अंगावर काटा आणेल अशी धक्कादायक घटना मंगळरु (Mangaluru) येथे रविवारी घडली आहे. रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या 25 वर्षीय महिलेसह तिच्या मुलाला पाठून येणाऱ्या जीप चालकाने धडक दिल्याचा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मधून उघडकीस आला आहे.
या प्रकरणी टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महिला जीप खाली चिरडली गेली असून तिच्या मुलाला ही दुखापत झाली आहे. परंतु नशीब बलवत्तर म्हणून दोघे या अपघातातून सुदैवाने वाचले आहेत. मात्र जीम मधील चालकाने एवढ्या जोरात धडक देत गाडी का चालवली याबाबात आता तपास केला जात आहे.
तसेच पोलिसांकडून अद्याप या घटनेला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून लवकरच घेण्यात आल्यावर कारवाई केली जाणार आहे.