Mumbai Shocker: माथेरानमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्काची(Minor Girl Rape) घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून नराधमाने त्या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. तो सोशल मीडियावरही अपलोड केला होता. १२ जुलै रोजी माथेरानमधील(Matheran) एका हॉटेलमध्ये हा घृणास्पद प्रकार घडला. आपल्या तीन मित्र-मैत्रिणींबरोबर पिडीत मुलगी फिरायला गेली होती. त्या अल्पवयीन मुलीवर एका मुलाने बलात्कार केला. तर उर्वरित दोघांनी या घटनेचे चित्रिकरण करुन ते सोशल मीडियावर प्रसारित केला. (हेही वाचा: Thane Rape Case: लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या 27 वर्षीय डॉक्टर आरोपीचा जामीन कोर्टाने फेटाळला)
ज्या दोघांनी बलात्काराच्या घटनेचे चित्रिकरण करुन ते प्रसारित केले, त्यापैकी एक असलेल्या २२ वर्षीय युवकाला गेल्या शुक्रवारी 19 जुलैला पोलिसांनी अटक केली आहे. चित्रिकरण करणारी त्यांची सहकारी मैत्रिण आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा प्रमुख आरोपी अद्याप फरार असून त्या दोघांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होताच पीडितेच्या नातेवाईकांनी तो पाहिला आणि त्यांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर याबाबत पीडित मुलीकडे तिच्या पालकांनी विचारणा केली असता तिने या घटनेचा खुलासा केला. कुटुंबियांनी अँटॉप हिल पोलिस स्थानक गाठत औपचारिक तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी 22 वर्षीय संशयिताला अटक केली. सध्या दोघे फरार असून त्या आरोपींचा शोध सुरू आहे. (हेही वाचा: Hyderabad Gang Rape: हैदराबादमध्ये महिलेवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, दोघांना अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित मुलीने तिच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन दिवसांसाठी बाहेर जात असल्याचे आपल्या पालकांना सांगितले होते. माथेरानमधील हॉटेलमध्ये त्या दोन मुलांपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला. उर्वरित दोघांनी या घटनेचे चित्रिकरण केले. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर १४ जुलै रोजी प्रसारित करण्यात आला.
त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, अपहरण आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) यासह कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पोलिसांनी अश्लील साहित्याचा ऑनलाइन प्रसार रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदी लागू केल्या आहेत.
महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:
चाइल्डलाइन इंडिया – 1098; महिला हेल्पलाइन - 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग – 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन – 7827170170; पोलीस महिला / ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन – १०९१/ १२९१; हरवलेली मुले आणि महिला - 1094.