MHA Clarifies on Midnight Order: दारु, सिगरेट, तंबाखूच्या विक्रीवर निर्बंध कायम, ई-कॉमर्स कंपन्यांना फक्त अत्यावश्यक वस्तूंची डिलिव्हरी करण्याची परवानगी, हॉटस्पॉट/कंन्टेंटमेंट झोनमध्ये नियम कायम; वाचा सविस्तर वृत्त

तर संबंधित राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील कन्टेंटमेंट झोनमधील दुकाने ग्रामीण किंवा शहरी भागात असतील तरीही ती बंदच राहणार आहेत.

देशतील कोरोनाची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने 20 एप्रिल पाहून उद्योगधंदे सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी नवी मार्गदर्शक सुचनांची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार दुकाने सुरु करण्यात येणार असल्याची परवानगी दिली आहे. परंतु दारु, तंबाखू, सिगरेट किंवा अन्य वस्तूंच्या विक्रीवरील निर्बंध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत MHA यांनी ई-कॉमर्स कंपन्यांना असे ही सांगितले आहे की, त्यांनी फक्त अत्यावश्यक वस्तूंची डिलिव्हरी करावी. तर संबंधित राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील कन्टेंटमेंट झोनमधील दुकाने ग्रामीण किंवा शहरी भागात असतील तरीही ती बंदच राहणार आहेत.

नव्या सुचनावली नुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने ई-कॉर्मस कंपन्यांना फक्त अत्यावश्यक सुविधा पुरवाव्यात असे स्पष्ट केले आहे. तर दारु किंवा अन्य वस्तूंची विक्री करण्यावर पूर्णपणे निर्बंध आहेत. त्याचसोबत कन्टेंटमेंट झोन किंवा कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी दुकाने सुरु होणार नाहीत असे ही सांगण्यात आले आहे. या परिपत्रकात असे म्हटले आहे की, “ग्रामीण भागात शॉपिंग मॉल्सच्या व्यतिरिक्त सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरी भागात सर्व स्टँडअलोन / शेजारची दुकाने आणि निवासी संकुलांमधील दुकाने उघडण्यास परवानगी आहे. बाजारपेठ / बाजार संकुले आणि शॉपिंग मॉल्समध्ये दुकाने आहेत. उघडण्यास परवानगी नाही.(Coronavirus Lockdown Relaxed: देशभरातील नोंदणीकृत दुकाने सुरु करण्यास MHA ची परवानगी; लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या)

Tweet:

Tweet:

तसेच सलून आणि केशकर्तनालय दुकाने सुद्धा बंद राहणार आहेत. कारण फक्त विक्री करणाऱ्यात येणाऱ्या वस्तूंसाठीच परवानगी देण्यात आली असल्याचे पुण्या श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.

Tweet:

वरील परित्रकात नमुद करण्यात आलेल्या सुचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत दारु, तंबाखू आणि सिगरेट लॉकडाउनच्या काळात विकण्यावर पूर्णपणे बंदी आहे. यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी रात्री एक परित्रक जाहीर करत असे म्हटले होते की, देशभरातील दुकाने सुरु होणार आहेत. मात्र मॉल्स सुरु होणार नाहीत. दुकाने सुरु करताना फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ते सुरु करावेत असा नियम सुद्धा त्यात स्पष्ट करण्यात आला होता. त्यानंतर गृह मंत्रालयाने देशात कोणत्या गोष्टी सुरु राहणार आणि नाहीत याबाबस सुद्धा सांगितले होते.