MCD Election Result 2022: भाजपच्या सत्तेला सुरुंग, आम आदमी पार्टीची विजयी वाटचाल, 126 जागांवर आघाडी

दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी (MCD Election Result 2022) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे.

MCD Election Result 2022 (Photo Credit: Facebook)

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपचा (BJP) पत्ता कट करण्याच्या मार्गावर आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी (MCD Election Result 2022) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. आतापर्यंत हातील आलेल्या माहितीनुसार, आपने भाजपपेक्षा 25 जागांवर आघाडी घेतली आहे. आपच्या एकूण कामगिरीबद्दल सांगायचे तर आपचे उमेदवार 126 जागांवर आघाडीवर आहेत.

MCD निवडणूक निकाल 2022 बाबता सकाळी 11 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची पक्षनिहाय संख्या आणि स्थिती खालील प्रमाणे

आम आदमी पार्टी-

56 जागा जिंकल्या, 77 जागांवर आघाडी

भाजप

46 जागा जिंकल्या, 58 जागांवर आघाडी

सकाळी 11.30 च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, AAP ने 56 जागा जिंकल्या आहेत आणि एकूण 133 पर्यंत 77 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत आणि 58 वर आघाडीवर आहे, 104 ची भर पडली आहे. दुसरीकडे काँग्रेस हात खूप मागे होता, फक्त चार जागा जिंकल्या आणि सहा जागा जिंकल्या. (हेही वाचा, दिल्ली महापालिका निवडणुकीत आपची आघाडी कायम, भाजपासमोर आव्हान)

दरम्यान, आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी अगदीच सुमार आहे. काँग्रेसने आतापर्यंत केवळ चार जागा जिंकल्या आहेत आणि सहा जागांवर आघाडी आहे.

राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये महापालिका निवडुकीसाठी 250 वॉर्डांसाठी 4 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली. महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी 126 हा बहुमताचा आकडा जादूई आहे. एकूण 42 केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. या वेळी एकूण 1,349 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

दरम्यान, पाठिमागील 15 वर्षांपासुून एमसीडीमध्ये भाजपची सत्ता आहे. MCD पुन्हा एकत्र झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. 2017 मध्ये, भाजपने तत्कालीन 270 पैकी 181 नगरपालिका वॉर्ड जिंकले होते, तर AAP फक्त 48 जिंकले होते.  कॉंग्रेस 30 जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर होती.

दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर जमलेआहेत. उत्साहाने घोणाबाबजी सुरु झाली आहे. आपचे नेतेही पक्ष कार्यालयात दाखल होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर AAP चे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी आपला पक्ष विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.